टाईडने केस धुतले, टॉयलेटच्या पाण्याने बनवली कॉफी; अभिनेत्रीची दुबईच्या जेलमधून निर्दोष सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:23 AM2023-04-28T11:23:28+5:302023-04-28T11:24:30+5:30
शेजाऱ्यांनीच केली होती ड्र्ग्स प्रकरणात फसवणूक, अखेर एक महिन्यांनी झाली सुटका
'सडक 2' सिनेमातील सहाय्यक अभिनेत्री क्रिसन परेराची (Chrisann Pareira) दुबईच्यातुरुंगातून सुटका झाली. सुमारे एक महिना ती दुबईच्या शारजाह जेलमध्ये होती. ड्रग्स तस्करी प्रकरणात ती अडकली होती. जशीजशी प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा तिला शेजाऱ्यांनीच फसवलं असल्याचं उघड झालं. तिला या प्रकरणाची काहीच कल्पना नव्हती हे समोर आलं आणि तिची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर येताच तिने भावाशी व्हिडिओ कॉल वरुन संवाद साधला. यावेळी तिची आई आनंदाने नाचत असल्याचं दिसलं.
क्रिसन परेराची आई प्रमिला परेरा यांची अखेर व्हिडिओ कॉल वरुन लेकीशी संवाज साधला. यावेळी त्यांचा आनंदात गगनात मावत नव्हता. त्या अक्षरश: उड्या मारत नातच होत्या. मुलीला निर्दोष सिद्ध करण्याचा आईचा प्रयत्न कमी नव्हता. आईला आनंदित झालेलं बघून क्रिसनही भावूक झाली होती. तिला रडू कोसळलं.
क्रिसनला ड्र्ग तस्करी प्रकरणात फसवणारे मुंबईचे रहिवासी एंथनी पॉल आणि राजेश बुवत ला अटक करण्यात आली आहे. पॉल यांचे मालाडमध्ये बेकरी शॉप आहे. तर राजेश बँकेत सहायक प्रबंधक आहेत.
तुरुंगातील दिवसांबद्दल क्रिसन परेरा म्हणाली,'मी टॉयलेटच्या पाण्याने कॉफी बनवायचे. तर टाईडने माझे केस धुतले. पेन आणि कागदही मला चार आठवड्यांनी देण्यात आलं. मी बॉलिवूड सिनेमे पाहिले. तेव्हा मला रडू यायचं की याच सिनेमांच्या स्वप्नासाठी मी झटत होते.' क्रिसनची आता अखेर या सुटका झाली असून येत्या काही तासात ती भारतात पोहोचणार आहे.