तोंडात सिगार आणि डोळ्यावर गॉगल, नवीन लूकमध्ये दिसला Allu Arjun; नेटकरी म्हणाले - 'फायर है पुष्पा २ न्यू लूक'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:05 PM2022-07-30T12:05:30+5:302022-07-30T12:06:01+5:30

Pushpa Fame Allu Arjun : अल्लू अर्जुन हा साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Cigar in mouth and goggles on eyes, Allu Arjun in new look; Netkari said - 'Fire Hai Pushpa 2 New Look' | तोंडात सिगार आणि डोळ्यावर गॉगल, नवीन लूकमध्ये दिसला Allu Arjun; नेटकरी म्हणाले - 'फायर है पुष्पा २ न्यू लूक'

तोंडात सिगार आणि डोळ्यावर गॉगल, नवीन लूकमध्ये दिसला Allu Arjun; नेटकरी म्हणाले - 'फायर है पुष्पा २ न्यू लूक'

googlenewsNext

अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साउथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जुनची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे, त्यामुळेच त्याचे अनेकदा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुनचा फोटो व्हायरल होत आहे, जो अभिनेत्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 

अल्लू अर्जुन हा अशा कलाकारांपैकी एक आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. अल्लू अर्जुनचा वेगळा लूक आणि स्टाइल या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. फोटोत, अभिनेत्याने तोंडात सिगार धरलेली दिसत आहेत. त्याने काळा गॉगलही घातला आहे. तसेच काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. फोटोत अल्लू अर्जुनचा लूक दमदार दिसतो आहे. हा फोटो शेअर करताना त्याने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.


अल्लू अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सिगार पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे'. अभिनेत्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडतो आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'विक्रम सरांना आवडले.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'पुष्पा पार्ट २.' तिसऱ्याने लिहिले, 'फायर है पुष्पा २ न्यू लूक.' याशिवाय अल्लू अर्जुनचे चाहते आणि अनेक सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत.

Web Title: Cigar in mouth and goggles on eyes, Allu Arjun in new look; Netkari said - 'Fire Hai Pushpa 2 New Look'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.