‘सिंडे्रला’ची साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
By Admin | Published: October 25, 2015 03:07 AM2015-10-25T03:07:56+5:302015-10-25T03:07:56+5:30
भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा उलगडणाऱ्या ‘सिंडे्रला’ या चित्रपटाची यंदाच्या ‘साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल’मध्ये निवड करण्यात आली आहे.
भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा उलगडणाऱ्या ‘सिंडे्रला’ या चित्रपटाची यंदाच्या ‘साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल’मध्ये निवड करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर २०१५ रोजी चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथे या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे. ‘सिंड्रेला’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांनी सिने-दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे.
अभिनय कट्टा व कृपासिंधू पिक्चर्स निर्मित या सिनेमाची कथा ही आपल्या सर्वांच्या जवळची असून ही ‘खरी कथा की परी कथा’ हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पाहावा लागणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रूपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता मंगेश देसाईने एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादूही आपल्याला पाहायला मिळणार आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.