Circus Box Office Collection Day 1:रणवीर सिंगचा 'सर्कस'ने पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, जाणून घ्या आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 04:53 PM2022-12-24T16:53:52+5:302022-12-24T16:59:05+5:30

रणवीर आणि रोहितचे फॅन्स या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. अशात चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील कमाईचं आकडे समोर आले आहेत. 

Circus box office collection day 1 Ranveer Singh cirkus | Circus Box Office Collection Day 1:रणवीर सिंगचा 'सर्कस'ने पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, जाणून घ्या आकडा

Circus Box Office Collection Day 1:रणवीर सिंगचा 'सर्कस'ने पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, जाणून घ्या आकडा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा सर्कस हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केला आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमधील अ‍ॅक्शन एका वेगळ्या स्तरावरची असला तरी त्याचे सिनेमे कॉमेडीसाठीही ओळखले जातात. रणवीर आणि रोहितचे फॅन्स या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. अशात चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील कमाईचं आकडे समोर आले आहेत. 

सर्कसमध्ये रणवीर सिंग आणि वरुण शर्मा यांचा डबल रोल आहे. चित्रपटाच्या टीमचं म्हणणं होते की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडलं. मात्र समोर आलेल्या आकड्यांवरुन तसे काही दिसत नाहीय. रिपोर्टनुसार चित्रपटाने पहिल्यादिवशी ६ ते ७ कोटींच्या दरम्यान कमाई केली आहे. अजून अधिकृत आकडासमोर आलेला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला रणवीर सिंग जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे त्याला सर्कस सिनेमाकडून आशा आहेत. बघूया क्रिसमस व्हॅकेशनचा फायदा चित्रपटाला होतो का.
 
'सर्कस’ बाबत बोलायचे झाले तर यात 60 च्या दशकातील कहाणी आहे. रणवीर सिंग इलेक्ट्रिक मॅन म्हणून सर्कसमध्ये काम करत असतो. याचदरम्यान रणवीर व वरूण शर्माच्या डबलरोलची एन्ट्री होते आणि सिनेमात नवा टिष्ट्वस्ट येतो. मग अख्ख्या सिनेमाभर गोंधळात गोंधळ पाहायला मिळतो. 


 

Web Title: Circus box office collection day 1 Ranveer Singh cirkus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.