Cirkus Twitter Reaction: काय 'सर्कस' लावलीय का? आमचे पैसे परत द्या!, थिएटरमधून बाहेर येताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:11 PM2022-12-23T15:11:30+5:302022-12-23T15:11:39+5:30
Cirkus Twitter Reaction: ‘सर्कस’ या सिनेमाची रिलीजआधी चांगलीच हवा होती. पण रिलीजनंतर या चित्रपटानं कदाचित प्रेक्षकांची निराशा केली आहे. किमान सोशल मीडियावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच दिसतंय.
Cirkus Twitter Reaction: रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला ‘सर्कस’ (Cirkus) हा सिनेमा आज रिलीज झाला. रणवीर सिंग (Ranveer Singh), जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरूण शर्मा, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, टीकू तलसानिया अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची रिलीजआधी चांगलीच हवा होती. पण रिलीजनंतर या चित्रपटानं कदाचित प्रेक्षकांची निराशा केली आहे. किमान सोशल मीडियावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच दिसतंय.
‘सर्कस’ पाहून भडकले लोक ...
रणवीर सिंगचा ‘सर्कस’ पाहिल्यानंतर लोक भडकले. अगदी इंटरव्हलमध्येच अनेकांनी ट्विटरवर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. ‘सर्कसचा इंटरव्हल झाला आहे. बकवास डायलॉग, ओव्हर अॅक्टिंगख, ओव्हर सॅच्युरेटेड बॅकग्राऊंड हे सगळं पाहून चित्रपट नकली वाटतो. सिनेमा जराही हसवत नाही,’अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.
Came out of theater and now I want my money back. Never expected rohit shetty film this much boring, unbearable, bakwas, unnecessary songs.
— Sentinel (@KattarKapoor) December 23, 2022
Worst thing about the film is double role of Ranveer Singh His voice is so irritating 😖
⭐(1/5) UNBEARABLE #CirkusReview#Cirkuspic.twitter.com/08PsTwAGSp
#Cirkus Interval
— Yogesh Rokde (@yogirokde) December 23, 2022
Jaisi sochi thi abtak waisi hi chal rahi hai...
Cringe dialogues, Overhyped acting, very bright and oversaturated backgrounds jo pure movie theme ko nakli sa feel kara rahe hai....
And abhitak hasi bhi nahi aayi hai....😐
Why ROHIT why?
#Cirkus first half :
— Sasta Tarantino (@Sunny_parkhi_99) December 23, 2022
Trailer me kuch nahi tha, kyuki movie me kuch nahi hai. pic.twitter.com/yCkgz8CKhp
Pure Irritating Movie Experience🥴💀#Cirkus deserves an award for BAAP OF OVER THE TOP /LOUD /CRASS ACTING EVER in a single film.
The good news is if you can sit through Humshakals, you will be able to bear this one too.
MADE FOR KIDS, maybe BY THE KIDS! #CirkusReview— N (@Nilzrav) December 22, 2022
‘क्यों रोहित क्यों’ अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘असं वाटतंय, रोहित शेट्टीकडे जावं आणि आपल्या तिकिटाचे पैसे परत मागावे,’अशी प्रतिक्रिया एका युजरने सिनेमा पाहिल्यानंतर नोंदवली. एका युजरने या सिनेमाला डिजास्टर म्हणत या चित्रपटाबद्दल निराशा व्यक्त केली. हा रोहित शेट्टीचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बकवास सिनेमा असल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली.
‘सर्कस’ हा सिनेमा एक कॉमेडी सिनेमा आहे. यात रणवीर डबल रोलमध्ये आहे. ‘सर्कस’मध्ये 60 च्या दशकातील कहाणी आहे. रणवीर सिंग इलेक्ट्रिक मॅन म्हणून सर्कसमध्ये काम करत असतो. याचदरम्यान रणवीर व वरूण शर्माच्या डबलरोलची एन्ट्री होते आणि सिनेमात नवा टिष्ट्वस्ट येतो. मग अख्ख्या सिनेमाभर गोंधळात गोंधळ पाहायला मिळतो.