महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट अन् रांगडी प्रेमकथा, येतेय तुमच्या भेटीला, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 10:38 AM2024-09-22T10:38:37+5:302024-09-22T10:38:58+5:30

दोन गावात धुमसणारं वैर, कळशीचा छावा अन् साखरगावातील साहेबरावांच्या लेकीमध्ये फुलणारी लव्हस्टोरी

Colors Marathi Announces New Serial Tanmay D Jakka and Sanika Moser star Lai Aavdtes Tu Mala Watch Promo | महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट अन् रांगडी प्रेमकथा, येतेय तुमच्या भेटीला, पाहा प्रोमो

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट अन् रांगडी प्रेमकथा, येतेय तुमच्या भेटीला, पाहा प्रोमो

Marathi Serial  : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी जोरदार प्रयत्न मराठी वाहिन्यांकडून सुरू आहेत. त्याच अनुषंगाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी नवीन मालिका येत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर एका परीने सध्या सगळ्या नवीन मालिकाच सुरू आहेत. तरीही या मालिकांमध्ये आता या नवीन मालिकेची भर पडली आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या या नव्या मालिकचे नाव 'लय आवडतेस तू मला' असे आहे. मालिकेच्या हटके नावाप्रमाणेच ही मालिकादेखील थोडी वेगळी असणार आहे. नुकत्या प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा पाहायला मिळतेय. या मालिकेत अभिनेता तन्मय जक्का आणि अभिनेत्री सानिका मोजर हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 


 'लय आवडतेस तू मला' या मालिकेत कळशी आणि साखरगाव या दोन गावांमधील वैर पाहायला मिळेत.  साखरगावाच्या साहेबरावांची मुलगी सानिका आणि कळशीचा छावा असलेला सरकार यांच्याभोवती मालिकेची कथा असेल. प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय की,  कळशीचा छावा असलेला सरकारची बुलेटवरून एन्ट्री होतो, तर गावातली मुलं विहिरीत पडलेल्या मांजरीला आणि सानिकाला वाचवण्यासाठी त्याला बोलावतात.  कळशीचा छावा मुलांच्या मदतीला धावून जातो आणइ विहिरीत पडलेल्या मांजरीसह सानिलाका बाहेर काढतो. सानिकाला पाहताच तो तिच्या प्रेमात पडल्याचं दिसून येतं. ही मालिका कोणत्या तारखेपासून आणि किती वाजता येणार हे स्पष्ट झालेले नाही. 
 

Web Title: Colors Marathi Announces New Serial Tanmay D Jakka and Sanika Moser star Lai Aavdtes Tu Mala Watch Promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.