झाडाची फांदी कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा ५४ वर्षीय दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:19 AM2024-07-06T11:19:46+5:302024-07-06T11:22:20+5:30

प्रसिद्ध अभिनेत्याचा ५४ वर्षीय दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय (tony knight)

Comedian actor Tony Knight dead at 54 following terrible accident in France | झाडाची फांदी कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा ५४ वर्षीय दुर्देवी मृत्यू

झाडाची फांदी कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा ५४ वर्षीय दुर्देवी मृत्यू

झाडाची फांदी कोसळून सुप्रसिद्ध अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अभिनेता म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेता टोनी नाइट. या दुर्दैवी घटनेत अभिनेत्याने ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. फ्रान्समधील लॅव्हर येथे रॉक अँड कार्स फेस्टिव्हलमध्ये झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या फेस्टिव्हलमध्ये झाडाची मोठी फांदी त्याच्या अंगावर पडल्याने तो गतप्राण झाला. अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 

झाडाची फांदी तुटली अन्...

मीडिया रिपोर्ट्सनुसार 'रॉक अँड कार्स फेस्टिव्हल'मध्ये एका मोठ्या झाडाच्या दोन फांद्या तुटून जोरात खाली कोसळल्या. अंगावर फांदी पडल्याने नाइटचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय अन्य चार जण जखमी झाले आहेत. टोनी नाइटचा मित्र जोआन एलनने या दुर्दैवी घटनेविषयी लिहिलंय की, "तो तंदुरुस्त, निरोगी आणि आनंदी होता. त्याच्याकडे सर्वकाही होते. तो मजेदार, दिलखुलास होता. जगभरातील त्याचे मित्र त्याच्यावर खूप प्रेम करायचे."

आधी अभिनेता नंतर पेट ट्रेनर

टोनी हा प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता होता. मनोरंजन क्षेत्रात काम करण्याबरोबर नाइटने त्याची कुत्र्यांबद्दलची आवड जपली होती. पुढे टोनीने पेट ट्रेनर म्हणून त्याचं करिअर बदललं. टोनीने वैयक्तिकरित्या जगभरातील लोकांना त्याच्या ऑनलाइन वर्गांद्वारे, रेडिओ आणि टेलिव्हिजन, ईपुस्तके आणि इतर माध्यमांद्वारे मदत केली आहे. टोनी त्याचा कॉमेडी शो मॅड डॉग्स एंड एन इंग्लिशमॅन ऑस्ट्रेलिया आणि संपूर्ण ब्रिटनमध्ये कार्यक्रम सादर करणार होता. पण त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Web Title: Comedian actor Tony Knight dead at 54 following terrible accident in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.