"कायम मोलकरणीच्याच भूमिका मिळतात..." जॉनी लिव्हरच्या लेकीने दाखवलं इंडस्ट्रीतील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:32 PM2023-11-24T15:32:22+5:302023-11-24T15:33:04+5:30
सिनेमाच्या प्रमोशनवेळी जेमीने बॉलिवूडमध्ये सतत मिळणाऱ्या मोलकरणीच्या भूमिकेचा उल्लेख केला.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांची लेक जेमी लिव्हरमध्ये इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जेमी (Jamie Lever) सोशल मीडियावरील तिच्या व्हिडिओंमधून नेहमी चाहत्यांचं मनोरंजन करत असते. नुकताच तिचा 'यात्रीज' हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमाच्या प्रमोशनवेळी जेमीने बॉलिवूडमध्ये सतत मिळणाऱ्या मोलकरणीच्या भूमिकेचा उल्लेख केला.
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जेमी म्हणाली, "माझ्या पहिल्याच सिनेमात मी मोलकरणीची भूमिका केली. हाऊसफुल मध्येही मी मोलकरणीसारखाच रोल केला. पण पॉपकॉर्नमध्ये मला वेगळी भूमिका मिळाली. दुर्दैवाने महिला कॉमेडियन्सला अशाच भूमिका दिल्या जातात. पण मी वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते."
"मी कधीच याचा जास्त विचार नाही केला नाहीतर मला कामावर लक्षच देता आलं नसतं. मी निराश झाले असते. मला काम तरी मिळतंय हेही खूप मोठी गोष्ट आहे. लोक मला आठवणीने बोलावतात. आता एवढंच की वेगवेगळ्या गोष्टी करण्याचे प्रयत्न करत राहायचे हेच मी ठरवलंय."
जेमी लिव्हर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अनेकदा ती बॉलिवूड स्टार्सची नक्कल करताना दिसते. सोनम कपूर, अनन्या पांडेचा तिने अनेकदा अभिनय केला आहे. वडील जॉनी लिव्हरसारखंच तिच्यातही टॅलेंट भरलेलं आहे. आपल्या विनोदी शैलीने ती चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.