पहिल्याच नजरेत झालं प्रेम, १२ वर्षे पाहिली वाट; अशी होती राजू श्रीवास्तव यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:40 PM2022-09-21T12:40:37+5:302022-09-21T12:42:57+5:30

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं.वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

comedian Raju Srivastava had to wait for 12 years to get married, see his interesting love story | पहिल्याच नजरेत झालं प्रेम, १२ वर्षे पाहिली वाट; अशी होती राजू श्रीवास्तव यांची लव्हस्टोरी

पहिल्याच नजरेत झालं प्रेम, १२ वर्षे पाहिली वाट; अशी होती राजू श्रीवास्तव यांची लव्हस्टोरी

googlenewsNext

नवी दिल्ली : गेली ४० दिवस मृत्यूशी झुंज देत असलेले कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं.वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांना हसवण्यात गेले, त्यांच्या विनोदामुळे अनेकांनी आपले दु:ख विसरले. तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच मजेदार आहे. त्यांच्या लग्नाची गोष्टही एखाद्या चित्रपटासारखीच आहे. राजू श्रीवास्तव यांनी पत्नीला प्रपोज करण्यासाठी तब्बल १२ वर्ष लावली होती. 

राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या पत्नी शीखा यांना पहिल्यांदा भावाच्या लग्नामध्ये पाहिले होते. शीखा यांना पहिल्यांदा पाहिल्यावर श्रीवास्तव त्यांच्या प्रेमात पडले होते, त्यांनी यावेळीच ठरवले लग्न केले तर शीखा यांच्याशीच करायचे.

'शोले' सिनेमानं राजू श्रीवास्तव यांचं आयुष्यच बदललं; पहिल्यांदा ५० रुपये मिळाले

श्रीवास्तव यांनी त्यांच्या भावाच्या लग्नात शीखा यांना पाहिल्यानंतर काही दिवसातच शीखा यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. शीखा या त्यांच्या वहिनींच्या चुलत्यांची मुलगी असल्याची माहिती मिळाली. शीखा या इटावा येथे रहायला होत्या. त्यामुळे राजू श्रीवास्तव यांचे इटावा येथे येणे- जाणे असायचे.ते शीखा यांच्या भावांसोबत कोणत्याही कारणाने बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण शीखा यांच्यासोबत बोलण्याचे त्यांचे कधीही धाडस झाले नाही. 

त्यांचे एकतर्फी प्रेम होते, पुढ राजू श्रीवास्तव करिअर करण्यासाठी १९८२ मध्ये मुंबईमध्ये आले. मुंबईत त्यांनी पैसे कमावण्यास सुरूवात केली. यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नाचा विचार करण्यास सुरूवात केली, यावेळी त्यांनी घरच्यांकडून शीखा यांना लग्ना संदर्भात विचारण्यासल सांगितले. यानंतर १९९३ मध्ये अखेर श्रीवास्तव यांचे लग्न शीखा यांच्यासोबत झाले. 

 

Raju Shrivastav Passed Away : विनोदवीराची अकाली 'एक्झिट'! राजू श्रीवास्तव यांचं निधन; तब्बल ४० दिवस मृत्यूशी झुंज

तब्बल १२ वर्षानंतर राजू श्रीवास्तव यांनी शीखा यांच्यासोबत लग्न केले. त्यांचे लग्न लखनौमध्ये झाले.पण ते शीखा यांना कधीच प्रपोज करु शकले नाहीत. कोणतही कारण सांगून ते शीखा यांच्या घरी येण-जाणे होते. श्रीवास्तव यांना दोन मुल आहेत. एक मुलगी आहे तर दुसरी मुलगी. मुलीचे नाव अंतर, मुलाचे नाव आयुष्यमान आहे. अंतर सोशल मीडियावर अॅक्टीह असते. ती असिस्टंट डिरेक्टर आहे. आज राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

Web Title: comedian Raju Srivastava had to wait for 12 years to get married, see his interesting love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.