कॉमेडियन उपासना सिंग दिसणार सुनिल ग्रोव्हरसोबत ह्या शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 06:30 AM2018-11-28T06:30:00+5:302018-11-28T06:30:00+5:30

कॉमेडियन उपासना सिंग लवकरच एका शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

Comedian Upasana Singh will appear in this show with Sunil Grover | कॉमेडियन उपासना सिंग दिसणार सुनिल ग्रोव्हरसोबत ह्या शोमध्ये

कॉमेडियन उपासना सिंग दिसणार सुनिल ग्रोव्हरसोबत ह्या शोमध्ये

googlenewsNext

उपासना सिंग, सुनिल ग्रोव्हर आणि अलि असगर यांच्यासोबत स्टार प्लसवरील कॉमेडी शो ‘कानपुर वाले खुराणाज्‌’मध्ये दिसून येणार आहे. हा शो एक मध्यमवर्गीय जीजा ऊर्फ सुनिल ग्रोव्हर आणि त्याच्या ६ मस्तीखोर साली यांच्यावर आधारीत आहे.

उपासना सुनिल ग्रोव्हरच्या सालीपैकी एक असेल आणि मनोरंजनाला एका वेगळ्‌या उंचीवर घेऊन जाणार आहे. या बद्दल उपासना सिंग म्हणाली, “माझे दोस्त आणि निश्चितपणे उत्तम कॉमेडियन्स सुनिल ग्रोव्हर आणि अलि असगर यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना मला खूप आनंद होत आहे. ह्या शोमध्ये माझी ताज्या दमाची नवीन भूमिका नक्कीच खूप साऱ्या मस्ती आणि मॅडनेसची भर टाकेल. ह्या शो ची संकल्पना सर्वांना आपलीशी वाटेल अशी आहे.”
सुनिल ग्रोव्हर, अलि असगर आणि उपासना सिंग ह्या ड्रीम टीमसह स्टार प्लसवरील कानपुर वाले खुराणाज्‌ निश्चितपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल. हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
केवळ 12-15 एपिसोडची ही सिरीज असणार आहे. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींचाही सहभाग असणार आहे.  या शोची संकल्पना कपिल शर्मा शो सारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शोला कपिल शर्माची  एक्स गर्लफ्रेंड आणि एक्स क्रिएटिव हेड प्रीति सिमोसच निर्मिती करत आहे. डिसेंबरमध्ये हा शो रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे चर्चा आहेत. शाहरुख खान आणि रणवीर सिंह सुनील ग्रोवरचे पहिले पाहुणे असणार आहेत. ज्यांच्याबरोबर सुनील ग्रोवर आपल्या अंदाजाने रसिकांचे मनोरंजन करताना दिसेल. या शोच्या माध्यमातून  सुनील ग्रोवरचा फुल ऑन कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे.

Web Title: Comedian Upasana Singh will appear in this show with Sunil Grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.