नात्यांमधील गोंधळ रंगमंचावर
By Admin | Published: August 30, 2015 11:38 PM2015-08-30T23:38:29+5:302015-08-30T23:38:29+5:30
व्यक्तीचे जीवन खूप सरळ असते. नोकरी किंवा व्यवसायामध्ये यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीत ‘यशस्वितेच्या’ कळसाला तो गवसणी घालतो. आयुष्यात यश तर मिळते
व्यक्तीचे जीवन खूप सरळ असते. नोकरी किंवा व्यवसायामध्ये यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीत ‘यशस्वितेच्या’ कळसाला तो गवसणी घालतो. आयुष्यात यश तर मिळते, पण व्यस्ततेमुळे कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही, ही सल त्याला बोचत राहते. कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी चाललेल्या धडपडीतून साधारणे ५५ ते ६०व्या वर्षी रिटायर्ड होणे आणि त्यानंतर मुला-बाळांसोबत, आपल्या जोडीदारासमवेत आयुष्य व्यतित करणे अशी त्याची माफक इच्छा असते. मात्र सरत्या काळात चूल-मूलमध्ये आयुष्य घालवलेली बायको जेव्हा स्वत:चा जगण्याचा मार्ग निवडते. त्यामुळे नात्यांमधला गोंधळ, नात्यांची इमोनशनल बँक कशी तयार होते? नेमक्या याच विषयावर भाष्य करीत आहे शेखर धवलीकर यांनी लिहिलेले आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेले ‘के दिल अभी भरा नहीं’ हे नाटक. येत्या १ सप्टेंबर रोजी हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
या नाटकामध्ये विक्रम गोखले, रिमा लागू प्रमुख भूमिकेत आहेत. आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर माणूस निवृत्ती स्वीकारतो आणि त्या यशाचा आनंद घेऊ इच्छितो. पण यामध्ये त्याची इच्छा असते, की निवृत्तीनंतरही त्याला त्या यशाबद्दल घरातील सदस्यांकडून मान मिळावा. पण तो न मिळाल्याने होणारी चिडचिड, या वेळी पती-पत्नीमध्ये होणारे संवाद, एकमेकांना समजून घेण्यासाठी केले जाणारे प्रयत्न या नाटकात पाहायला मिळणार आहेत. विक्रम गोखले रंगभूमीवर प्रथमच रिमा लागू यांच्याबरोबर काम करीत आहेत.