अमेरिकेतील डान्स शोमध्ये 'मल्हारी' गाण्यावर थिरकले स्पर्धक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 08:54 PM2016-09-10T20:54:49+5:302016-09-10T20:54:49+5:30
अमेरिकेतील डान्स शो 'सो यू थिंक यू कॅन डान्स'मध्ये स्पर्धक रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील 'मल्हारी' गाण्यावर थिरकले आहेत
>- ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 10 - बॉलिवूड स्टार्सचे चाहते जगभरात आहेत. मात्र आपल्या सुपरस्टार्सपेक्षाही बॉलिवूड म्युझिकची जास्त क्रेझ आहे. परदेशात लग्न, रिअॅलिटी शो इतकंच काय तर ऑलिम्पिकमध्येही बॉलिवूड गाण्यावर लोक थिरकले आहेत. यावेळी अमेरिकेतील डान्स शो 'सो यू थिंक यू कॅन डान्स'मध्ये स्पर्धक रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील 'मल्हारी' गाण्यावर थिरकले आहेत. सोशल मिडियावर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
पाश्चिमात्य देशांना नेहमीच बॉलिवूडच्या गाण्यांनी वेड लावलं आहे. याचा फायदा हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अंतर कमी करण्यातही झाला. जे टी आणि मार्को या स्पर्धकांनी मल्हारी गाण्यावर बॉलिवूड डान्स करत लोकांच भरपूर मनोरंजन केलं. त्यांचा हा परफॉर्मन्सला प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवत दाद दिली.