हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट; कोर्टाने कन्नड अभिनेत्यास पाठवलं १४ दिवसांच्या कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 03:23 PM2023-03-22T15:23:57+5:302023-03-22T15:25:04+5:30

अभिनेता चेतन कुमार यांनी ट्विटमध्ये, हिंदू धर्माचे अस्तित्त्व खोटे असल्याचे म्हटले होते

Controversial tweets about Hinduism; The court granted 14 days custody to the Kannada actor | हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट; कोर्टाने कन्नड अभिनेत्यास पाठवलं १४ दिवसांच्या कोठडीत

हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट; कोर्टाने कन्नड अभिनेत्यास पाठवलं १४ दिवसांच्या कोठडीत

googlenewsNext

कन्नड अभिनेता चेतन कुमारने हिंदूंच्या भावना दुखावणारं वादग्रस्त ट्विट केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. हिंदू धर्माला  अनुसरुन चेतन कुमारने वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप करत त्याच्यालविरुद्ध षेशाद्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली. 

अभिनेता चेतन कुमार यांनी ट्विटमध्ये, हिंदू धर्माचे अस्तित्त्व खोटे असल्याचे म्हटले होते. २० मार्च रोजी अभिनेत्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले होते. हिंदुत्त्व हे खोट्या गोष्टींवर टिकून असल्याचा दावा त्याने ट्विटमध्ये केला होता. 

'हिंदुत्त्व पूर्णपणे खोट्या गोष्टींवर आधारित आहे, सावरकर - भारतीय राष्ट्र तेव्हा सुरू झाले, जेव्हा रामाने रावणाला पराभूत केले आणि ते परत आले. हे खोटं

१९९२ - बाबरी मस्जित राम जन्मभूमी आहे, हेही खोटं
२०२३ - उरीगौड़ा-नानजेगौडा टीपू चे मारेकरी आहेत, खोटं, 

हिंदुत्वाला सत्याने पराभूत करता येते, सत्य समानता आहे'

असे ट्विट चेतनकुमारने केले होते. त्यानंतर, हिंदुंच्या भावना दुखावल्यामुळे षेशाद्रीनगर पोलिसांना अभिनेत्यास अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने चेतन कुमारला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Controversial tweets about Hinduism; The court granted 14 days custody to the Kannada actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.