कॉन्ट्रोव्हर्सी जरुरी है!
By Admin | Published: August 17, 2016 02:06 AM2016-08-17T02:06:02+5:302016-08-17T02:06:22+5:30
बॉलीवूडमध्ये कलावंतांच्या चर्चा आणि त्यांच्यात होणारे वाद चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. बॉलीवूडशी संबंध असलेले कलाकार, गायक, लेखक आदी लोक सोशल मीडियावर
बॉलीवूडमध्ये कलावंतांच्या चर्चा आणि त्यांच्यात होणारे वाद चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. बॉलीवूडशी संबंध असलेले कलाकार, गायक, लेखक आदी लोक सोशल मीडियावर एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकांचा हा फंडा हिट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे.
राखी सावंत
आयटम गर्ल राखी सावंत नेहमी काही ना काही कारणांसाठी चर्चेत असते. या वेळी तर तिने कहरच केलेला आहे. तिने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान केला आहे. या तिच्या ड्रेसमुळे तिला चांगलीच पब्लिसिटी मिळाली आहे.
नसीरुद्दीन शहा
काही दिवसांपूर्वीच नसीरुद्दीन शहा यांनीदेखील चर्चेत राहण्यासाठी असेच पाऊल उचलले होते. या कलाकाराने अभिनेता राजेश खन्ना यांच्या अभिनय क्षमतेविषयी मध्यंतरी टिष्ट्वट केले होते. यावर राजेश खन्ना यांची कन्या टिष्ट्वंकल हिनेदेखील चोख उत्तर दिले होते. टिष्ट्वंकल म्हणाली होती, जर तुम्ही जिंवत असलेल्या लोकांचा आदर करू शकत नाही तर हयात नसलेल्या लोकांचा तरी आदर करा, त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकांना ते उत्तर देऊ शकत नाहीत. हा वाददेखील टिष्ट्वटरवर चांगलाच गाजला होता.
अरिजीत सिंग
अरिजीत सिंग आणि सलमान खान यांचा सोशल मीडियावरील वाद काही संपता संपेना. नुकतेच अरिजीतने सांगितले की, यापुढे मी सलमान खानची माफी मागणार नाही. दोन ते तीन वर्र्षांपासून या दोघांमध्ये हे सोशल युद्ध पेटले आहे. या भांडणामुळे अरिजीत हा नेहमीच चर्चेत राहतो.
सलमान खान
सलमान खानला पाहता, तशी त्याला पब्लिसीटीची गरज नाही. पण हा बॉलीवूड सुपरस्टार वादात अडकल्याशिवाय राहत नाही. आगामी चित्रपटाचे प्रमोशन असो वा आॅलिम्पिक खेळाचा वाद असो या खानची चर्चा तर असतेच. सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशन वेळीदेखील सलमान चित्रपटापेक्षा त्याच्या स्टेटमेंट्समुळेच जास्त चर्चेत राहिला.
शोभा डे
लेखिका शोभा डे यादेखील चर्चेत राहण्यासाठी काही ना काही टिष्ट्वट करत असतात. त्यांनी चक्क या वेळी तर आॅलिम्पिक खेळाडूंवरच आपला निशाणा साधला आहे. आॅलिम्पिकमधील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवायचे सोडून त्यांनी थेट त्यांच्या कामगिरीवरच टीका केली आहे. शोभा डे यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले होते की, ‘रिओ जाओ, सेल्फी लो और खाली हात आओ’ त्यांच्या या टिष्ट्वटमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच बॉलीवूड व मराठी कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.