कोरोना व्हायरस 'या' अभिनेत्रीसाठी ठरते डोकेदुखी, युजर्स म्हणतायेत.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 12:41 PM2020-03-06T12:41:33+5:302020-03-06T12:43:19+5:30

डायना 2011 साली इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला.

Corona virus Funny Memes On diana penty Viral On Social Media-SRJ | कोरोना व्हायरस 'या' अभिनेत्रीसाठी ठरते डोकेदुखी, युजर्स म्हणतायेत.....

कोरोना व्हायरस 'या' अभिनेत्रीसाठी ठरते डोकेदुखी, युजर्स म्हणतायेत.....

googlenewsNext

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना सगळेच स्वतःची सुरक्षा कशी करता येईल याकडेच जास्त लक्ष देताना दिसत आहेत. भारतामध्येही या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरले असताना एक अभिनेत्री कोरोनामुळे जास्त चर्चेत आली आहे. कोरोना आणि डायना पेन्टीचा काय संबध असा प्रश्न तुम्हाला पडलाही असणार मात्र  'कॉकटेल' सिनेमात तिच्या एका गाण्याच्या ओळीने तिला प्रकाशझोतात आणले आहे. ''तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो'' या गाण्यातील ओळीली घेऊन तिची थट्टा मस्करी सोशल मीडियावर नेटीझन्स करत असल्याचे पाहायला मिळतंय.

डायना 2011 साली इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला. त्यानंतर रणबीर कपूरच्या अपोझिट या सिनेमात डायनाच्या जागी नरगिस फाखरीला घेण्यात आले.त्यानंतर 2012 मध्ये आलेल्या कॉकटेल सिनेमातून डायनाने डेब्यू केला. इम्तियाज अलीने त्याचे नाव दिग्दर्शक होमी अदजानियाला सुचवले होते. या सिनेमा डायनासोबतदीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होती.


सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. ऐवढेच नाही तर एका जाहिरामध्ये डायनाने दीपिकाला रिप्लेस केले होते. कॉकटेल हिट गेल्यानंतर डायना चार वर्षांनी हॅपी भाग जाएगी सिनेमात दिसली. हा एक कॉमेडी सिनेमा होता. याशिवाय डायना, लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्येही ती झळकली होती.

Web Title: Corona virus Funny Memes On diana penty Viral On Social Media-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.