Coronavirus : सेलिब्रिटीही म्हणतात, गर्दीच्या ठिकाणी जाणे, नको रे बाबा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 05:20 PM2020-03-22T17:20:41+5:302020-03-22T17:22:52+5:30

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना लागण होत या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात येत आहे. सेलेब्रिटींचा विचार केला तर त्यांना नेहमी प्रकाशझोतात राहणे आवडते. मात्र असेही काही सेलेब्स आहेत की, जे लाइमलाइटपासून कोसो दूर राहणे पसंत करतात. जाणून घेऊया अशा सेलेब्सच्या कपल्सबाबत...

Coronavirus : Celebrity also says, Avoid Going to crowded places | Coronavirus : सेलिब्रिटीही म्हणतात, गर्दीच्या ठिकाणी जाणे, नको रे बाबा...!

Coronavirus : सेलिब्रिटीही म्हणतात, गर्दीच्या ठिकाणी जाणे, नको रे बाबा...!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना लागण होत या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात येत आहे. असेही काही सेलेब्स आहेत की, जे लाइमलाइटपासून कोसो दूर राहणे पसंत करतात.

-रवींद्र मोरे
सध्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना लागण होत या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात येत आहे. सेलेब्रिटींचा विचार केला तर त्यांना नेहमी प्रकाशझोतात राहणे आवडते. मात्र असेही काही सेलेब्स आहेत की, जे लाइमलाइटपासून कोसो दूर राहणे पसंत करतात. जाणून घेऊया अशा सेलेब्सच्या कपल्सबाबत...

जॉन अब्राहम 


बॉलिवूडचा हॅँडसम हंक अभिनेता जॉन अब्राहमचे स्टारडम पुन्हा एकदा झळकू लागले आहे. गेल्या वर्षी त्याचा परमाणु आणि सत्यमेव जयते या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर मोठा धमाका केला होता. जॉनने गर्लफ्रेंड प्रिया रुंचलसोबत लग्न केले आहे. मात्र जॉन आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत जास्त मोकळे बोलताना दिसत नाही. शिवाय तो आणि त्याची पत्नी प्रिया दोघेही एकत्र पार्ट्यांमध्ये आणि इव्हेंटमध्ये जात नाहीत. अर्थात या दोघांना लाइमलाइटपासून लांब राहणे आवडते.

अमृता अरोरा 
या यादीत आपण सर्वप्रथम अमृताविषयी जाणून घेऊया. अमृता, अभिनेत्री मलायका अरोराची लहान बहीण आहे. मलायकाला सहसा मित्रांच्या पार्ट्यांमध्ये नेहमी पाहिले जाते. मात्र अमृताला तिचा पती शकील लडकसोबत क्वचितच बघितले गेले आहे. हे दोघेही बऱ्याच पार्ट्या, इव्हेंट एकत्र जाणे टाळतात. अर्थात ते लाइमलाइटपासून खूपच लांब आहेत.

दीया मिर्जा 


दीया मिर्जाने २०१४ मध्ये साहिल संघासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर दीया बºयाच पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये बघावयास मिळाली. दीयाला आपण ‘संजू’ चित्रपटातही पाहिले आहे. मात्र दीयाच्या पतीला बरेच कमी लोकं ओळखतात, कारण दीयासोबत तो सहसा दिसलाच नाही. कदाचित त्याला लाइमलाइटपासून लांब राहणेच आवडते.

राणी मुखर्जी 
यशराज परिवाराची सून आणि अभिनेत्री राणी मुखर्जीने आदित्य चोप्रासोबत लग्न केले आहे. लग्नाच्या बºयाच वर्षानंतरही हे कपल सोबत पब्लिकली आणि पार्ट्यांमध्ये खूपच कमी बघावयास मिळते. एवढेच नव्हे तर मुलीच्या वाढदिवसानिमित्तही आदित्यचा एकही फोटो समोर आला नव्हता. अलिकडे राणीने बºयाच सेलिब्रिटींच्या लग्नाला भेटी दिल्या, मात्र आदित्य तिच्यासोबत दिसलाच नाही.

सोनाली बेंद्रे 


अभिनेत्री सोनाली बेंद्रेचेही नाव या यादीत समावेश आहे. सोनालीने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे. मात्र दोघांना सोबत क्वचितच पाहण्यात आले आहे. सोनाली तर बºयाच इव्हेंटमध्ये आणि पार्ट्यांमध्ये हजेरी लावते, मात्र गोल्डी लाइमलाइटपासून लांबच राहतो.

Web Title: Coronavirus : Celebrity also says, Avoid Going to crowded places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.