CoronaVirus: लॉकडाउनमध्ये सोनम कपूर करतेय या व्यक्तींना मिस, शेअर केला फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:35 PM2020-04-10T18:35:33+5:302020-04-10T18:36:46+5:30

सोनम सध्या दिल्लीत असून ती या व्यक्तींना खूप मिस करते आहे.

CoronaVirus : Sonam Kapoor miss these people in Lockdown, shared photo on Instagram TJL | CoronaVirus: लॉकडाउनमध्ये सोनम कपूर करतेय या व्यक्तींना मिस, शेअर केला फोटो 

CoronaVirus: लॉकडाउनमध्ये सोनम कपूर करतेय या व्यक्तींना मिस, शेअर केला फोटो 

googlenewsNext

सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सोनम व आनंद दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत. हे कपल नुकतेच लंडनवरून परतले होते. यानंतर दोघांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. घरातून कुठेच हलता येत नसल्यामुळे सोनम तिच्या जवळच्या व्यक्तींना मिस करते आहे. तिने इंस्टाग्रामवर तिच्या बहिणीचा फोटो शेअर करत मिस करत असल्याचं म्हटलं आहे. तर सोनमने शेअर केलेल्या फोटोत तिची बहीण रिया आणि तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी आहे.

सोनम कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आणि लिहिले की, या दोघांना करतेय मिस. रिया कपूर व करण बुलानी.

अनिल कपूरची छोटी मुलगी आणि सोनम कपूरची बहिण रिया कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीत निर्माती म्हणून सक्रीय आहे. रिया गेल्या १० वर्षांपासून करण बुलानीला डेट करते आहे. तो सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. रियाचा बॉयफ्रेंड करण चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने 'आयशा' व 'वेकअप सिड' यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे, करणने कित्येक चित्रपट व शोजचे दिग्दर्शन, प्रोडक्शन व डबिंगचे काम केले आहे.

कोरोनाचा धोका असतानाही सोनम व आनंदने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे गत 19 मार्चला लंडनवरून भारतात परतले होते. यानंतर दोघांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे 'जोया फॅक्टर' या सिनेमात सोनम दिसली होती.

यानंतर ती सुजॉय घोष यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नांव 'ब्लाइंड' असल्याचे कळतेय.

Web Title: CoronaVirus : Sonam Kapoor miss these people in Lockdown, shared photo on Instagram TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.