कपिल देव यांनी '83' साठी स्टोरी सांगायचे किती पैसे घेतले माहितीये का? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 01:53 PM2021-12-22T13:53:07+5:302021-12-22T13:53:43+5:30
Kapil dev:'83' या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने तत्कालीन कर्णधार कपिल देव (kapil dev) यांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.
२५ जून १९८३ ही तारीख आणि लंडनमधील लॉर्ड्सचं मैदान या दोन गोष्टी कोणताही भारतीय व्यक्ती विसरणं शक्य नाही. या दिवशी भारताने विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच क्रिकेटविश्वातील विजयगाथेवर आधारित '83' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी प्रचंड वाट पाहिली आणि अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने तत्कालीन कर्णधार कपिल देव (kapil dev) यांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. यामध्येच क्रिकेटर कपिल देव यांनी त्या काळातील गोष्ट आणि त्या दिवशी काय घडलं हे सांगण्यासाठी किती मानधन घेतलं हे समोर आलं आहे.
भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर कबीर खान यांनी ’83’ हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट झळकली असून सध्या सोशल मीडियावर या कलाकारांच्या मानधनाची चर्चा होऊ लागली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी '83' च्या निर्मात्यांनी भारतीय खेळाडूंना १५ कोटी रुपये मानधन दिल्याचं सांगण्यात येतं. बॉलिवूड हंगामा डॉट कॉमनुसार, कपिल देव यांना त्यांची गोष्ट सांगण्यासाठी तब्बल५ कोटी रुपये मानधन देण्यात आलं आहे.
“चित्रपट तयार करण्यापूर्वी खेळाडूंच्या विषयाचे अधिकार, त्यांची वैयक्तिक कथा मिळवणं खूप गरजेचं आहे. खासकरुन तेव्हा ज्यावेळी वास्तविक जीवनातील घटना इतरांभोवती फिरत असतात. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाला सुमारे १५ कोटी रुपये दिले. यामध्ये कपिल देव यांना सर्वाधिक रक्कम देण्यात आली,” असं सांगण्यात येतं.
रणवीर व्यतिरिक्त हे कलाकार झळकले मुख्य भूमिकेत
या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे. तर,सुनील गावसकरांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, यशपाल शर्मांच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, के. श्रीकांत यांच्या भूमिकेत जिवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंग यांच्या भूमिकेत एमी. विर्क, सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नींच्या भूमिकेत निशांत दहिया हे कलाकार झळकले आहेत. तसंच पंकज त्रिपाठी यांनी टीम मॅनेजर पीआर मान सिंग यांची भूमिका वठवली आहे.