नायिकांच्या गुगलीने क्रिकेटर आऊट

By Admin | Published: November 21, 2015 04:03 AM2015-11-21T04:03:54+5:302015-11-21T04:03:54+5:30

बॉलीवूडच्या अभिनेत्रींना हॅण्डसम क्रिकेटपटूंचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. पार्टीज्मध्ये अथवा शूटिंगदरम्यान या सौंदर्यतारकांच्या क्रिकेटपटूंसमवेत भेटी होतात.

Cricketer out of the goalkeepers | नायिकांच्या गुगलीने क्रिकेटर आऊट

नायिकांच्या गुगलीने क्रिकेटर आऊट

googlenewsNext

बॉलीवूडच्या अभिनेत्रींना हॅण्डसम क्रिकेटपटूंचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. पार्टीज्मध्ये अथवा शूटिंगदरम्यान या सौंदर्यतारकांच्या क्रिकेटपटूंसमवेत भेटी होतात. या भेटी पुढे वाढत जातात आणि एक दिवस थेट लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचतात. हरभजन सिंग-गीता बसराचे तसेच झाले. युवराज सिंग-हॅजलही त्याच मार्गावर आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या मुहूर्त शोधत आहेत. नायिकांच्या गुगलीने क्रिकेटर आऊट होण्याची ही परंपरा तशी जुनीच आहे. बदलत्या काळाप्रमाणे त्यात नवीन नावे जुळत असतात इतकाच काय तो बदल...

मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर
स्व. मन्सूर अली खान पतौडी हे बॉलीवूड ‘दिवा’ शर्मिला टागोर यांना १९६५ साली या दोघांच्या कॉमन मित्राच्या पार्टीत भेटले. ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ असंच काही घडलं. शर्मिला या त्या काळी नावाजलेल्या अभिनेत्री होत्या आणि टायगर पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. या दोघांच्या घरातून विरोध असतानाही दोघे विवाहबंधनात अडकले. हे प्रेमप्रकरण आपल्या देशात खूप गाजले होते.

अंजू महेंद्रू-सर गॅरी सोबर्स
वेस्ट इंडीजचा संघ १९६७ साली भारतीय दौऱ्यावर आला होता. अंजू महेंद्रू आणि सर गॅरी सोबर्स अचानक भेटले अन् एकमेकांच्या प्रेमातही पडले. त्यांनी वाजत-गाजत साखरपुडाही केला. पण काही काळानंतर काय झाले कुणास ठाऊक त्यांच्यातील संबंध संपुष्टात आले.

इम्रान खान-झीनत अमान
इम्रान खान म्हणजे क्रिकेटचा प्ले बॉय आणि लक्षावधींचा हार्ट थ्रोब. झीनत अमान म्हणजे बॉलीवूडची बॉम्बशेल. दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट होते. डेटिंगदरम्यान दोघेही बऱ्याच ठिकाणी एकत्र फिरताना दिसून यायचे, मात्र ही कहाणीही अधुरीच राहिली आणि लवकरच दोघेही वेगळे झाले.

रवी शास्त्री-अमृता सिंग
१९८५ साली आॅस्ट्रेलियात आॅडी जिंकल्यानंतर रवी शास्त्री एका रात्रीत स्टार झाला. त्यावेळी अमृता ही ख्यातनाम अभिनेत्री होती. पुढे केव्हा तरी ते एकत्र भेटले. या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा चालल्या. परंतु हे नातेही दीर्घकाळ टिकले नाही.

रीना रॉय-मोहसीन खान
करिअरच्या अगदी सोनेरी वळणावर म्हणजे १९८३ साली रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानसोबत लग्न केले. मोहसीन खानने चित्रपट क्षेत्रातील करिअरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. पण त्यांच्या संसारालाही दृष्ट लागली. अखेर दोघांनी घटस्फोट घेतला.

मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी
हे दोघे एकमेकांना भेटले त्या वेळी अझरचे लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले होती. अझर त्याच्या कारकिर्दीत सर्वोच्च ठिकाणी होता. संगीता बिजलानीही यशस्वी अभिनेत्री होती. संगीतासाठी अझरने आपल्या पत्नीला तलाक दिला आणि संगीतासोबत लग्न केले. १४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१० साली दोघे विभक्त झाले.

Web Title: Cricketer out of the goalkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.