Cuteness Overloaded...! रणवीर सिंगला दीपिका पादुकोणनं इमोशनल पोस्ट लिहून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 10:56 AM2019-07-07T10:56:26+5:302019-07-07T10:57:11+5:30
दीपिका पादुकोणनं नवरा रणवीर सिंगचा वाढदिवस आणखीन खास बनवण्यासाठी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहिली.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग एकमेकांवरील प्रेम व्यतित करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. दीपिका पादुकोणनं नवरा रणवीर सिंगचा वाढदिवस आणखीन खास बनवण्यासाठी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहिली. दीपिकानं रणवीरच्या बालपणीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोत रणवीर बर्फाचा गोळा खाताना दिसतो आहे. रणवीरचा हा फोटो खूप क्युट आहे.
रणवीरचा क्युट फोटो शेअर करून दीपिकानं मेसेज लिहिला. ती म्हणाली की, सेंसिटिव्ह, भावुक, नेहमी काळजी घेणारा व दयाळु, उदार व नम्र, फनी आणि समजूतदार, आनंदी व प्रामाणिक...हे सगळं आणि भरपूर काही... माझा नवरा, मित्र, प्रेमी, विश्वासू... पण, जास्त करून माझं बाळ, माझं अननस, माझं सनशाईन, माझा रेनबो... तु नेहमी असाच रहा...आय लव यू...
दीपिकानं जगातील सर्व शब्दांचा वापर करून रणवीरसाठी इतकं प्रेम असलेला संदेश लिहिला.
रणवीर व दीपिका सध्या लंडनमध्ये आहेत. दीपिकानं लंडनमधील वेळेनुसार रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रणवीरनं 6 जुलैला आपला 34वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी जसे की आलिया भट, रितेश देशमुख, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, प्रियंका चोप्रा व इतर काही कलाकारांनी रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र सर्वजण दीपिका पादुकोणच्या स्पेशल मॅसेजची वाट पाहत होते आणि तिचा मॅसेज पाहून सर्वांचं मन भावुक झालं.
दीपिका व रणवीर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते दोघे एकत्र 83 चित्रपटात झळकणार आहेत. लग्नानंतरचा हा त्यांचा पहिला एकत्र असणारा चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारताना दिसणारेय.
83 शिवाय रणवीर जयेशभाई जोरदारमध्ये तर दीपिका छपाक चित्रपटात दिसणार आहे.