भिवंडीचे शिवाजीनगर ध्वजपथक ठरला डोंबिवलीच्या 'तालसंग्राम २०१८'चा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:46 PM2018-01-29T12:46:10+5:302018-01-29T12:56:36+5:30
डोंबिवली: आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमाने भरविण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय ढोलताशा पथकाचा रविवारी शानदार पारितोषिक वितरण समारंभ तब्बल १० हजार ...
डोंबिवली: आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमाने भरविण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय ढोलताशा पथकाचा रविवारी शानदार पारितोषिक वितरण समारंभ तब्बल १० हजार डोंबिवलीकरांच्या उपस्थितीत संपन्ना झाला. भिवंडीच्या शिवाजीनगर पथकाने प्रथम क्रमांक पटकावत 'तालसंग्राम २०१८' चा बहुमान मिळवला. तर पाल्यार्चे पार्लेश्वर ढोलपथकाने द्वितीय, आणि वसईच्या अविष्कार ढोलपथकाने तृतिय क्रमांक पटकावला. याखेरीज उत्कृष्ठ ढोल वादक अविष्कार ढोल पथक, उत्कृष्ठ ताशावादक शिवाजीनगर, उतकृष्ठ टोलवादक अभिनव स्वरगर्जना तसेच उत्कृष्ठ ध्वजधारी कलारंग, डोंबिवली या पथकाने मान मिळवला.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जगन्नाथ शिंदे, मनसेचे नेते-शांतीरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक प्रमोद(राजू) पाटील, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक दिपेश म्हात्रे, विशू पेडणेकर, खुशबु चौधरी, डॉ. सुनिता पाटील, ज्योती मराठे, निलेश म्हात्रे, प्रकाश भोईर, शिवसेनेचे दिंडोरी संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर, रवी ठाकुर, माजी नगरसेवक राजन मराठे, विजय पाटील, बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्यासह लोकमत वृत्तपत्र समुहाचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान, आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष निशांत चव्हाण, श्रीकांत घोगरे, ऋषिकेश पाठक, यज्ञेश पाटील, हर्षद पाटील, प्रतिक शिवलकर, गायत्री दलाल, मीनल गोडबोले, ऋषिकेश जोशी, प्रतिष्ठानचे सल्लागार अनिकेत घमंडी यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या पथकांना सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक क्रिडा विभाग मंत्री विनोद तावडे यांचे सहकार्य उल्लेखनिय होते. प्रथम विजेत्ता पथकाला दिड लाख रुपयांचे पारितोषिक, द्वितिय पथकाला १ लाख तर तृतिय क्रमांकाच्या पथकाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. हा निधी शांतीरत्नचे प्रतिष्ठानचे संस्थापक राजू पाटील यांनी दिला. तर सावळाराम क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या स्पधेर्साठी मंडप आणि प्रेक्षक गॅलरीची सर्व जबाबदारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उचलली होती. खासदार श्रीकांत शिंदेंसह, आमदार आप्पा शिंदें, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायीचे सभापती राहुल दामले, भाऊ चौधरी, मनोज रमेश म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले होते. त्या स्पधेर्साठी डोंबिवलीसह मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण आदी ठिकाणांमधून १४ पथक सहभागी झाली होती. त्यात प्रामुख्याने शिवसुत्र-बदलापूर, पार्लेस्वर-विलेपार्ले, कलारंग प्रतिष्ठान-डोंबिवली, माऊली ढोल ताशा पथक- डोंबिवली, शिवस्वरूप-भिवंडी, आम्ही कांदिवलीकर-कांदिवली, अभिनव स्वरगर्जना-पनवेल, रुद्र -ठाणे, शुवसुत्र-नाहूर, शिवाजीनगर-भिवंडी, अविष्कार-वसई, उत्सव-खारघर आदी दिग्गज पथकांचा समावेश होता. यास्पधेर्ला परिक्षक म्हणुन या क्षेत्रातील प्रख्यात जाणकार गणेश गुंड-पाटील, स्वानंद ठाकूर,सुजित सोमण रा. रमणबाग, तसेच निलेश कांबळे-रणवाद्य,व विजय साळुंखे-शिवगर्जना, आकश चोकसे, ज्ञानप्रबोधिनी पुणे येथून आले होते. डोंबिवली शहरातही नामांकीत ढोलपथकांनी महावादन केले.