Dadasaheb Phalke IFF Awards 2022: रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता, सिद्धार्थ मल्होत्रा ‘क्रिटीक्स बेस्ट अ‍ॅक्टर’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 02:24 PM2022-02-21T14:24:31+5:302022-02-21T14:26:16+5:30

Dadasaheb Phalke IFF Awards 2022: मुंबईत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा थाटात पार पडला. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बाजी मारली.

Dadasaheb Phalke IFF Awards 2022 ranveer singh best actor Sidharth Malhotra wins Critics Best Actor | Dadasaheb Phalke IFF Awards 2022: रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता, सिद्धार्थ मल्होत्रा ‘क्रिटीक्स बेस्ट अ‍ॅक्टर’

Dadasaheb Phalke IFF Awards 2022: रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता, सिद्धार्थ मल्होत्रा ‘क्रिटीक्स बेस्ट अ‍ॅक्टर’

googlenewsNext

Dadasaheb Phalke IFF Awards 2022:  रविवारी मुंबईत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा थाटात पार पडला. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh)आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)यांनी बाजी मारली.  रणवीरला ‘83’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा ‘शेरशाह’ या चित्रपटासाठी ‘क्रिटीक्स बेस्ट अ‍ॅक्टर’ अवार्डचा मानकरी ठरला.  सिद्धार्थच्या याच चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही आपल्या नावे केला. अभिनेत्री क्रिती सॅननला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

‘पुष्पा’चाही बोलबाला
देशभरात धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा- द राइज’ या साऊथ सिनेमानेही दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारावर नाव कोरलं. या चित्रपटाला ‘फिल्म आॅफ द इअर’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

सिद्धार्थने कियाराला मारली मिठी

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अ‍ॅक्टर क्रिटिक्स अवार्ड जिंकल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा जाम खूश दिसला. आनंदाच्या भरात त्याने त्याची कथित गर्लफ्रेन्ड कियारा अडवाणीला मिठी मारली. दोघांनी  एकत्र कॅमेºयाला पोझही दिली.

पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीस सिंग, ’83’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सॅनन, ‘मिमी’

 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सतिश कौशिक, ‘कागज’

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दल्ला, ‘बेल वॉटम’

 सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह

सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा, ‘शेरशाह’

सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेत्री – कियारा अडवाणी, ‘शेरशाह’

चित्रपट सृष्टीतील योगदान – ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख

बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म – अनदर राऊंड

बेस्ट डायरेक्टर – केन घोष, ‘स्टेज ऑफ सेज : टेम्पल अटॅक’

बेस्ट सिनेमॅटोग्राफर – जयकृष्णा गुम्माडी, ‘हसीना दिलरुबा’

सर्वोत्कृष्ट अभिनेता निगेटिव्ह रोल – आयुष शर्मा, ‘अंतिम’

पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेता – अभिमन्यू दसानी

पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेत्री – राधिका मदन

 बेस्ट डेब्यू – अहान शेट्टी, ‘तडप’

फिल्म ऑफ द इयर – पुष्पा : द राईज

बेस्ट वेब सिरीज – कॅन्डी

सर्वोत्कृष्ट अभिनेता, वेब सिरीज – मनोज वाजपेयी, ‘फॅमिली मॅन 2’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, वेब सिरीज – रविना टंडन, ‘आरण्यक’

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – विशाल मिश्रा

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर

सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट – पाऊली

सर्वोत्कृष्ट मालिका – अनुपमा

 सर्वोत्कृष्ट अभिनेता, टेलिव्हिजन – शाहीर शेख, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’

 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, टेलिव्हिजन – श्रद्धा आर्या, ‘कुंडली भाग्य’

सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेता, टेलिव्हिजन – धीरज धूपर

सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेत्री, टेलिव्हिजन – रुपाली गांगुली

सर्वोत्कृष्ट समिक्षक चित्रपट – सरदार उधम

Web Title: Dadasaheb Phalke IFF Awards 2022 ranveer singh best actor Sidharth Malhotra wins Critics Best Actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.