‘डीडीएलजे’@१०००

By Admin | Published: December 18, 2014 01:25 AM2014-12-18T01:25:47+5:302014-12-18T01:25:47+5:30

यश चोप्रा निर्मित आणि आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’

'DDLJ' @ 1000 | ‘डीडीएलजे’@१०००

‘डीडीएलजे’@१०००

googlenewsNext

पूजा सामंत, मुंबई
यश चोप्रा निर्मित आणि आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने प्रदर्शित होऊन १००० आठवड्यांचा विक्रम केला. त्याची नोदं गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होत असल्याचे वृत्त मराठा मंदिर सिनेगृहाकडून मिळतंय. मराठा मंदिरचे व्यवस्थापक प्रवीण राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चित्रपट इतिहासात सलग २० वर्षे एखाद्या सिनेमाने तळ ठोकावा, अशी ही पहिलीच घटना आहे. गेला संपूर्ण आठवडा चित्रपट हाऊसफुल असून, गेली २० वर्षे मॅटिनी शोमध्ये चालू असलेल्या या सिनेमाचं दररोजचं बुकिंग किमान ५० टक्के, तर वीकेण्डला ७० ते ८० टक्के असतं.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाच्या १००० सप्ताहांचं औचित्य साधून मराठा मंदिर आणि यशराज स्टुडिओमध्ये चित्रपटाची मुख्य जोडी शाहरूख खान आणि काजोल यांनी या चित्रपटाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. काळ््या रंगाच्या सुटमध्ये पाठीवर ‘दिलवाले...’मधील सॅक लटकवून थेट राजच्या गेटअपमध्ये शाहरूख मंचावर आला, तर काळ््या रंगाच्या गाऊनमध्ये काजोलने वॉकिंग स्टिकचा आधार घेत कधी शाहरूखची फिरकी तर कधी नॉस्टॅलजिक होत ‘दिलवाले...’ च्या स्मृती जागवल्या.
शाहरूखला ‘दिलवाले...’ची आॅफर देण्यापूर्वी राजची भूमिका सैफ अली खानला देण्याचा प्रस्ताव होता. शाहरूख सांगतो, राजची भूमिका माझ्यासाठी माइलस्टोन ठरली़ माझं संपूर्ण जीवनच या चित्रपटाने बदललं़ माझी रोमॅन्टिक इमेज कायम केली, ती भूमिकाच मी नाकारली होती. कारण बाजीगर, डरच्या यशाने माझ्या नकारात्मक व्यक्तिरेखाच प्रेक्षकांना आवडताहेत अशी समजूत होती. पण यश चोप्रांना नकार देऊ शकलो नाही.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाचे शीर्षक किरण खेर यांनी सुचवलं, तेव्हा एवढ्या लांबलचक शीर्षकाचा कधी चित्रपट असतो का, असा त्या दोघांचा नेहमीच सूर असे.
चित्रपटादरम्यानच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी यश-पामेला चोप्रा दाम्पत्याच्या आदरातिथ्याची, चविष्ट पंजाबी फूडची आठवण काढली. ‘घर आजा परदेसी तेरा देस बुलाएं गे’ गीत पामेला चोप्रांनी गायले, जे नंतर जतीन-ललित लता मंगेशकरांकडून गाऊन घेणार होते़ पण पामेला यांचा आवाज सगळ्यांनाच इतका आवडला, की त्यांच्याच स्वरात कायम ठेवले गेले. पॅरिसला चित्रण करायचं ठरवलं होतं, परंतु गौरी आजारी पडल्याने शाहरूखला भारतात परत यावं लागलं.
‘दिलवाले...’ने दिली प्रेमाची नवी तरीही भारतीय संस्कृतीची एक भाषा...मैं जिंदगीभर ‘राज’ बना रहना चाहता हूँ, असं शाहरूख उगाच म्हणत नाही.

Web Title: 'DDLJ' @ 1000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.