पुन्हा मराठी मंदिरमध्ये झळकणार 'दिल वाले दुल्हनिया' सिनेमा, पूर्ण होणार यश चोप्रा यांचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 03:54 PM2020-11-05T15:54:17+5:302020-11-05T15:59:16+5:30
'जब तक है जान' म्हणत अखेरपर्यंत स्वतः चे जीवन चित्रपटसृष्टीसाठी वाहणाऱ्या यश चोप्रा यांचे मराठा मंदिरमध्ये डीडीएलजेचे १००० आठवडे पूर्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस मराठा मंदिर चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाचा आहे.
१५ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊन चित्रपटगृह, तसेच मल्टिप्लेक्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे.केंद्र सरकारने काही नियम घालून दिले आहेत. मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांच्या प्रेक्षक क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांनाच प्रवेश देण्यात यावा, तसेच एक सीट सोडून प्रेक्षकांना बसविण्यात यावे, प्रत्येक प्रेक्षकाने मास्क घालणे बंधनकारक आहे असे काही नियम लागू करण्यात आले आहेत. चित्रपटगृह सुरू होणार म्हटल्यावर पुन्हा एकदा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज होणार आहे.
यश चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाची जादू आजही कायम असल्याचे तुम्ही पाहिलंय... रसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली.. शाहरुख आणि काजोलची जोडी रातोरात हिट झाली. मात्र ज्या सिनेमागृहात दुल्हनिया ले जायेंगेने २५ वर्ष पूर्ण केलीत त्या मराठा मंदिरला कोरोना संसर्गामुळे ब्रेक घ्यावा लागला होता.
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमाला आता नव्या विक्रमाला गवसणी घालायची आहे. हा विक्रम म्हणजे खुद्द यश चोप्रा यांचे स्वप्न... काय होता यश चोप्रा यांचे स्वप्न..यश चोप्रा यांचे स्वप्न होते १००० आठवडे..२५ वर्षापूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे प्रदर्शित झाला..एकाच सिनेमागृहात हा सिनेमा रसिकांवर अधिराज्य गाजवेल याची पुसटशी कल्पना यश चोप्रांना नव्हती. मात्र दिवसामागून दिवस, आठवड्यामागून आठवडे आणि वर्ष मागून वर्ष उलटली तरी दिलवाले दुल्हनिया सिनेमाने मराठा मंदिरमध्ये तुफान गर्दी खेचली होती.
पूर्ण झाल्यानंतर खुद्द यश चोप्राही या रसिकांसह डीडीएलजे पाहण्यापासून स्वःताला रोखू शकले नव्हते.. त्यावेळी या सिनेमाचे सलग १००० आठवडे मराठा मंदिर मध्ये पूर्ण व्हावते अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती... त्यामुळे 'जब तक है जान' म्हणत अखेरपर्यंत स्वतः चे जीवन चित्रपटसृष्टीसाठी वाहणाऱ्या यश चोप्रा यांचे मराठा मंदिरमध्ये डीडीएलजेचे १००० आठवडे पूर्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस मराठा मंदिर चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाचा आहे.