लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाल्याने आमिरवर खोल परिणाम..., किरण रावचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 03:55 PM2024-02-11T15:55:11+5:302024-02-11T15:57:23+5:30
आमिर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली
आमिर खान (Aamir Khan) हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट. आमिरचे सिनेमे जेव्हा रिलीज होतात तेव्हा ते सुपरहिटच असतात. प्रेक्षक आमिरच्या सिनेमांना पसंती देतात. परंतु २०२२ मध्ये रिलीज झालेल्या आमिरच्या 'लाल सिंंग चढ्ढा' (Lal Singh Chaddha) सिनेमाला मात्र प्रेक्षकांनी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद दिला. आमिरच्या 'लाल सिंग चढ्ढा'वर फ्लॉपचा शिक्का बसला. अखेर आमिरची पुर्वपत्नी किरणने (Kiran Rao) याविषयी मौन सो़डलंय.
'लाल सिंग चढ्ढा' सिनेमाच्या निराशाजनक कामगिरीबद्दल किरण म्हणाली, "जेव्हा तुम्ही तुमचे १०० % सर्व प्रयत्न करता आणि असं काहीतरी होतं तेव्हा हे खरोखर निराशाजनक आहे. लाल सिंग चड्ढाच्या बाबतीत असंच घडलं. आणि या अपयशाचा आमिरवर खूप खोलवर परिणाम झाला. याचा आम्हा सर्वांवर परिणाम झाला कारण, हा एक असा प्रोजेक्ट होता जो कोविडसारख्या अनेक संकटांवर मात करत पुढे आला होता. आमिरसाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. या सिनेमाच्या हक्कांसाठी गेल्या १० वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत होतो."
The best of music album :-
— Jinesh Chandran Poolakkal (@jineshtweets) April 12, 2023
Lal Singh Chaddha (2022) #LalSinghChaddhapic.twitter.com/HgjWAmtZon
किरण राव पुढे म्हणाली, "त्यामुळे लाल सिंग चढ्ढा फ्लॉप होणं आमच्यासाठी वेदनादायी होतं. मला खरोखर आनंद आहे की, लोकं लाल सिंग चड्ढाच्या ओटीटी रिलीजनंतर चांगला प्रतिसाद देत आहेत. मला वाटते की, या चित्रपटाला फारशी संधी मिळाली नाही. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही किंवा ते पाहू इच्छित नाही हे सत्य आम्हाला स्वीकारावे लागले." 'लाल सिंग चड्ढा' सध्या नेटफ्लिक्सवर पाहता येईल.