दीपिका पादुकोणसारखं फिट रहायचं असेल तर जाणून घ्या तिचा डाएट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 08:00 PM2019-11-10T20:00:00+5:302019-11-10T20:00:00+5:30

दीपिका फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेते. तसंच ती डाएटबाबत अलर्ट असते.

Deepika Padukone diet plan is here, read this Article | दीपिका पादुकोणसारखं फिट रहायचं असेल तर जाणून घ्या तिचा डाएट प्लान

दीपिका पादुकोणसारखं फिट रहायचं असेल तर जाणून घ्या तिचा डाएट प्लान

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिका दिवसभरातून सहा वेळा थोड्या प्रमाणात खाते हेल्दी फूड दीपिकाच्या दिवसाची सुरुवात होते कोमट पाण्यानं

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने आपल्या अभिनय कौशल्यानं सगळ्यांना भुरळ पाडली आहे. दीपिकाचा बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. दीपिका फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेते. तसंच ती डाएटबाबत अलर्ट असते. रिपोर्टनुसार ती दिवसभरातून सहा वेळा थोड्या प्रमाणात हेल्दी पदार्थ खाते.


दीपिकाचा डाएट प्लानबद्दल जाणून घ्या. दीपिकाच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यानं होते. १ ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस टाकून हे पाणी ती सकाळी पिते.


दीपिकाच्या ब्रेकफास्टमध्ये २ अंडी, २ बदाम, १ कप लो फॅट मिल्क, २ इडल्या किंवा २ प्लेन डोसा किंवा उपमा याचा समावेश असतो.


दुपारच्या जेवणाआधी दीपिका ताजी फळं खाते. तर दुपारच्या जेवणात घरीच बनवलेली डाळ-भात, भाजी, सलाड आणि दही याचा समावेश असतो. तर कधी कधी प्रोटीनसाठी ती ग्रील फिश खाते.


संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये ती फिल्टर कॉफी, नट्स आणि काही फळं खाते. तर रात्रीच्या जेवणात भाजी-चपाती, फ्रेश ग्रीन सॅलेडचा समावेश असतो. या शिवाय बॉडी हायड्रेशनसाठी ती नारळ पाणी किंवा मग फ्रुट ज्यूस पिते. तर डेजर्टमध्ये डार्क चॉकलेटला तिची पसंती असते.


रिपोर्टनुसार दीपिकाचा कोणताही फिक्स असा डाएट प्लान नाही. सिनेमाच्या गरजेनुसार ती तिच्या डाएट प्लानमध्ये वेळोवेळी बदल करते. याशिवाय ती तिच्या वर्कआऊटबाबतही खूप जागरुक आहे.


दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर ती 'छपाक' चित्रपटात झळकणार आहे. तसंच '८३' चित्रपटात ती रणवीर सिंगच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Deepika Padukone diet plan is here, read this Article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.