दीपिकाने लग्नासाठी का केली इटलीची निवड? रणबीर कपूरशी तर नाही कनेक्शन??

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:16 PM2018-11-01T12:16:15+5:302018-11-01T12:18:03+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४ व १५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. आत्तापर्यंतची चर्चा खरी मानाल तर इटलीच्या लेक कोमोमध्ये हे लग्न होणार आहे. अर्थात दोघांनीही याबाबतची घोषणा केलेली नाही.

deepika padukone ranveer singh will do marriage in italy has connection with ranbir kapoor | दीपिकाने लग्नासाठी का केली इटलीची निवड? रणबीर कपूरशी तर नाही कनेक्शन??

दीपिकाने लग्नासाठी का केली इटलीची निवड? रणबीर कपूरशी तर नाही कनेक्शन??

googlenewsNext

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४ व १५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. आत्तापर्यंतची चर्चा खरी मानाल तर इटलीच्या लेक कोमोमध्ये हे लग्न होणार आहे. अर्थात दोघांनीही याबाबतची घोषणा केलेली नाही. दोघांचेही लग्न पारंपरिक रितीरिवाजानुसार होणार आहे. १३ नोव्हेंबरला संगीत सेरेमनी रंगणार आहे आणि १५ नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमोमध्ये शाही लग्न. आता दीपिका इटलीतच लग्न का करणार आहे, असा प्रश्न क्वचित तुमच्या मनात येऊ शकतो. अनेक वर्षांपासून एका मुलाखतीत दीपिकानेच या प्रश्नाचे उत्तर दिले होते. होय, दीपिकाने लग्नासाठी इटलीची निवड केली, याचा थेट संबंध दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरशी आहे. होय, दीपिकाने रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों में’ काम केले तेव्हा या चित्रपटातील ‘खुदा जाने...’ या गाण्याचे शूटींग इटलीला झाले होते. त्यावेळी दीपिका इटलीच्या अक्षरश: प्रेमात पडली होती आणि अगदी त्याचक्षणी लग्न आणि हनीमून इटलीत करण्याचे तिने ठरवले होते. इटली रोमॅन्टिक गाण्यांच्या शूटींगसाठी बेस्ट आहे, असेही दीपिका म्हणाली होती.
यापैकी एक इच्छा म्हणजे, इटलीत लग्न करण्याची दीपिकाची इच्छा कदाचित पूर्ण होतेय. होऊ शकते की, लग्नानंतर हनीमूनही ती आणि रणवीर इथेच साजरे करतील.

रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा आहे. अद्याप दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मान्य केलेले नाही. पण सार्वजनिक ठिकाणी अप्रत्यक्षपणे ते मान्य करण्यात त्यांनी कुठलीही कसूर ठेवलेली नाही.
दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे तर रणवीर सध्या ‘सिम्बा’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘गली ब्वॉय’ आणि १९९३ व्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘८३’ या चित्रपटातही तो बिझी आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. दीपिकाचे म्हणाल तर ‘पद्मावत’नंतर तिने दिग्दर्शिका  मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे

Web Title: deepika padukone ranveer singh will do marriage in italy has connection with ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.