दीपिका पदुकोणचा मुघलकालीन लूक

By Admin | Published: July 3, 2015 12:56 AM2015-07-03T00:56:59+5:302015-07-03T00:56:59+5:30

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मिन्नमा, फाइंडिंग फेनीमध्ये गोव्यातील अँजी, हॅपी न्यू ईयरमध्ये मोहिनी ही मराठी मुलगी आणि पीकूमध्ये बंगाली पीकू अशा वेगवेगळ्या ढंगातील भूमिका साकारणारी

Deepika Padukone's Mughal time Look | दीपिका पदुकोणचा मुघलकालीन लूक

दीपिका पदुकोणचा मुघलकालीन लूक

googlenewsNext

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मिन्नमा, फाइंडिंग फेनीमध्ये गोव्यातील अँजी, हॅपी न्यू ईयरमध्ये मोहिनी ही मराठी मुलगी आणि पीकूमध्ये बंगाली पीकू अशा वेगवेगळ्या ढंगातील भूमिका साकारणारी दीपिका पदुकोण आता मुघलकालीन अवतारामध्ये दिसणार आहे. संजय भन्सालीच्या ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ती मस्तानीच्या भूमिकेत दिसणार आहे. मस्तानी ही बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल बुंदेला यांची मुलगी, पण आई रुहानी पार्शियन मुस्लीम होती. चित्रपटात नक्षीदार शरारा आणि कुर्त्यामध्ये दीपिका दिसणार आहे. डिझायनर अंजू मोदीने दीपिकाचे कॉस्च्यूम बनवले आहेत. मस्तानीच्या भूमिकेमध्ये असलेल्या दीपिकाच्या कपड्यात लहंगा, शरारा आणि दुपट्टा यांचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपटातील एका भागामध्ये पेशवा राणीप्रमाणे तिचा लूक असणार आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री होती, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूच्या धक्क्याने तिचे निधन झाले होते.

Web Title: Deepika Padukone's Mughal time Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.