शाहरुखपासून दीपिका, सोनमची अभय देओलने उडवली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 04:49 PM2017-04-12T16:49:28+5:302017-04-12T18:21:45+5:30

रंग उजळण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींमध्ये बॉलिवूड कलाकार असतात. याच मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेता अभय देओलने फेसबूक पोस्ट केली आहे.

Deepika from Shah Rukh Khan, Sonam's abhay Deolal hoaxed hoarse | शाहरुखपासून दीपिका, सोनमची अभय देओलने उडवली खिल्ली

शाहरुखपासून दीपिका, सोनमची अभय देओलने उडवली खिल्ली

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - बॉलिवूड अभिनेता अभय देओलने गोरे होण्याच्या क्रिमची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर टीका केली आहे. टेलव्हिजनवर फेअरनेस क्रिमच्या दररोज भरमसाट जाहिराती झळकत असतात. या जाहिराती काही पुरुष वर्गासाठी असतात तर काही महिलांसाठी असतात. ही क्रिम अथवा प्रॉडक्ट वापरल्यास तुमचा रंग गोरा होईल, किंवा तुमची त्वचा अधिक उजळ होईल असा दावा केला जातो. रंग उजळण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींमध्ये बॉलिवूड कलाकार असतात. याच मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेता अभय देओलने फेसबूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये बॉलिवूड कलाकांराची त्याने खिल्ली उडवली आहे. या जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांचा समाचार घेताना अभिनेता अभय दोओल याने त्यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये शाहरुख खान पासून दीपिका पादुकोन, सोनम कपूर, शाहिद कपूर, नंदिता दास, जॉन अब्राहम, सिद्धार्थ मल्होत्रा यांचा समावेश आहे. 
सोशल मीडियापासून काहीसा दूर असणाऱ्या देओल आज फेसबुक पोस्टद्वारे बॉलिवूड कलाकारांची खिल्ली उडवली आहे. प्रत्येक कलाकारांच्या जाहिरातीसह फोटो पोस्ट करत त्याने त्यावर टिपण्णी केली आहे. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीद्वारे काळा गोरा असा रंग भेद निर्माण होतो आहे त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांनी पडू नये, असे त्याने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. अभिनेत्री नंदीता दासला तर त्याने आपल्या पोस्टमध्ये मूर्ख असे म्हटले आहे. 
 
फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत कोणताही विचार केला जाता नाही. ते फक्त आयडिया विकतात, त्यामध्ये ते सांगत असतात गोरा रंग काळ्या रंगापेक्षा चांगला आहे. या कंपनीच्या उच्चपदावर असणाऱ्या कोणत्याही अधिकारी तुम्हाला हे चुकीचं असल्याचं सांगत नाहीत का? अभय म्हणाला की, लोकांनी या कंपनीच्या जाहिरातीला बळी पडू नये, अशा जाहिराती पाहून प्रॉडक्ट विकत घेणं टाळावं. मॅट्रीमोनियल साईटवर जर आपण पाहिलं तर तिथे काळे अथवा गोरा असे सांगितले जात नाही. येथे कोणाच्या त्वचेचा रंग सांगण्यासाठी डस्क या शब्दाचा वापर केला जातो. गोरे लोक सुंदर असतात, हा पाश्चिमात्यांच्या विचारसरणीचा भाग आहे. आपण तो जसाच्या तसा उचलला आहे, अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. 
 
 

 

 

Web Title: Deepika from Shah Rukh Khan, Sonam's abhay Deolal hoaxed hoarse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.