दीपिका-शाहीदच्या ‘या’ संवादाने भडकेल का रणवीर?

By Admin | Published: October 21, 2016 03:39 AM2016-10-21T03:39:01+5:302016-10-21T03:39:01+5:30

दी पिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यात सध्या काहीही ‘आॅल-वेल’ नाही, ही बातमी तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे. दीपिकाच्या दुर्लक्षितपणामुळे रणवीर नाराज

Deepika-Shahid's dialogue with Ranveer? | दीपिका-शाहीदच्या ‘या’ संवादाने भडकेल का रणवीर?

दीपिका-शाहीदच्या ‘या’ संवादाने भडकेल का रणवीर?

googlenewsNext

दी पिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यात सध्या काहीही ‘आॅल-वेल’ नाही, ही बातमी तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे. दीपिकाच्या दुर्लक्षितपणामुळे रणवीर नाराज असल्याचे कळते आहे. आता या नाराजीत आणखी भर पडण्याची भीती आम्हाला सतावतेय. होय, दीपिका आणि शाहीद कपूर यांचा टिष्ट्वटरवर रंगलेला संवाद बघून रणवीर नाराज होऊ शकतो. दीपिकाने अलीकडे सलमानच्या ‘बिग बॉस’मध्ये ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटाचे ट्रेलर लॉन्च केले. या ट्रेलरमध्ये दीपिका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात आहे. या ट्रेलरनंतर दीपिकावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. शाहीदनेही हा ट्रेलर पाहिला आणि त्याने लगेच दीपिका टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या. ‘ट्रिपल एक्समधील तुझा अभिनय बघून मला तुझा अभिमान वाटतोय...’ असे शाहीदने म्हटले. शाहीदच्या या टिष्ट्वटला दीपिकाने लगेच उत्तर दिले. तिने केवळ शाहीदचे आभारच मानले नाहीत तर त्याला ‘साशा’ (शाहीदचे निकनेम) असे संबोधले. शिवाय तीन ‘किस’ करणाऱ्या ‘इमिकॉन’ही पाठवल्या. आता या ‘किस’ करणाऱ्या ‘इमिकॉन’ पाहून रणवीर भडकू नये म्हणजे झाले...!!

Web Title: Deepika-Shahid's dialogue with Ranveer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.