दीपिकाचा हॉलीवूड चित्रपट 'XXX 3' चा ट्रेलर रिलीज

By Admin | Published: July 20, 2016 12:48 PM2016-07-20T12:48:52+5:302016-07-20T12:51:33+5:30

हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'XXX: The Return of Xander Cage' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे

Deepika's Hollywood movie 'XXX 3' trailer release | दीपिकाचा हॉलीवूड चित्रपट 'XXX 3' चा ट्रेलर रिलीज

दीपिकाचा हॉलीवूड चित्रपट 'XXX 3' चा ट्रेलर रिलीज

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'XXX: The Return of Xander Cage' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दोन दिवसापुर्वी दिपिकाने टीझर रिलीज केला होता ज्यामध्ये तिचा जबरदस्त आणि हॉट अंदाज पाहायला मिळाला होता. ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असली तरी ट्रेलरमध्ये दीपिका मोजकीच दिसत असल्याने निराशा झाली आहे. 
 
('द रिटर्न ऑफ एक्सँडर केज’ च्या सेटवरील दीपिकाचा हॉट लूक)
 
दीपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा आहे. टीझरमधील दिपिकाच्या अभिनयाने चाहत्यांची उत्सुकता अजून वाढवली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. ४८ वर्षीय विन डीजेल यामध्ये 'Xander Cage' ची भूमिका निभावताना दिसणार आहे तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत दिसणार आहे. कॅनडामध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. या चित्रपटासाठी दीपिकाने खूप मेहनत घेतली असून काही दिवसांपूर्वी तिच्या जिमममधील ट्रेनिंगचे फोटोही सोशल साईट्सवर झळकले होते.
 

Web Title: Deepika's Hollywood movie 'XXX 3' trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.