Devoleena Bhattacharjee : सांग तू मला रिजेक्ट का केलंस? देवोलिनाच्या लग्नानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:29 AM2022-12-22T10:29:12+5:302022-12-22T10:41:21+5:30
Devoleena Bhattacharjee : होय, देवोलिना व शाहनवाज यांच्या लग्नानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे...
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) नुकतीच लग्नबंधनात अडकली. शाहनवाज शेखसोबत देवोलिनानं लग्नगाठ बांधली. खरं तर देवोलिना व शाहनवाजचं लग्न अनेकांना खटकलं. पण ‘गोपी’ बहू जाम खुश आहे. ‘चिराग लेके भी ढुंढती तो भी तुझ जैसा कोई नहीं मिलता...’, हे शाहनवाजसाठीचे देवोलिनाचे शब्दचं ती किती आनंदी आहे, हे सांगण्यास पुरेसे आहेत.
देवोलिना विशाल सिंहला डेट करतेय, असा अनेकांचा अंदाज होता. पण देवोलिनाने विशालला सोडून शाहनवाजच्या गळ्यात वरमाला घातली हे पाहून चाहते काहीसे गोंधळले. तिच्या लग्नाने अनेकांचं हृदय तुटलं. यात केआरके अर्थात कमाल आर खान याचंही नाव आहे. होय, देवोलिना व शाहनवाज यांच्या लग्नानंतर केआरकेची (KRK) पोस्ट चर्चेत आली आहे. आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणाऱ्या केआरकेने केलेलं ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच केआरकेनं देवोलिना व शाहनवाजच्या लग्नाबद्दल ट्वीट केलं होतं. ‘6 दिवासांपूर्वीपर्यंत देवोलिना विशालशी लग्न करण्यासाठी तयार होती. पण आज तिने अचानक शाहनवाजशी लग्न केलं. का? नक्कीच विशाल आणि देवोलिना यांच्यात काहीतरी बिनसलं,’असं त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
यावर देवोलिनानेही उत्तर दिलं होतं. ‘तू खरंच खूप मजेशीर आहेस केआरके. तुझा दिवस चांगला जावो,’ असं तिने लिहिलं होतं.
यानंतर केआरकेने आणखी एक ट्वीट केलं. आधी तर त्याने देवोलिनाला लग्नासाठी शुभेच्छा दिल्यात आणि मग आपल्या मनातल्या भावना उघड केल्या.
‘देवोलिना तुला लग्न आणि पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा. पण विश्वास ठेव मी शाहनवाझपेक्षा 1000 पटींनी चांगला होतो. पण मग तू मला नकार का दिलास?,’असं एक ट्वीट त्याने केलं. देवोलिनाने यावरही उत्तर दिलं. ‘कारण मला 1000 पटींनी चांगला नाही तर बेस्ट व्यक्ती हवी होती आणि मी वहिनीचं हृदय तोडू शकत नव्हते...,’असं तिने म्हटलं.
याआधी एकदा केआरकेने सोशल मीडियावरूनच देवोलिनाला प्रपोज केलं होतं. देवोलिना ‘बिग बॉस 13’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी एका ट्वीटमध्ये केआरकेने तिचं कौतुक केलं होतं शिवाय तिला प्रपोज केलं होतं. एवढंच नाही तर तिच्याशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अर्थात देवोलिनाने त्याला नकार दिला होता.