'फार लाजीरवाणं आहे हे'; कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यांची रत्ना पाठक यांनी केली कानउघडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:13 AM2023-10-13T09:13:25+5:302023-10-13T09:14:13+5:30
Ratna pathak: कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करतांना दिसतात.
बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक (ratna pathak) सध्या त्यांच्या धक धक या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. या सिनेमाममध्ये त्यांच्या सोबत दिया मिर्झा, फातिमा सना शेख, संजना सांघी या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांमुळे या सिनेमाची सर्व स्तरांमध्ये चर्चा रंगली आहे. यामध्येच रत्ना पाठक यांनी वयापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे.
कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करतात याविषयी तुमचं मत काय? असा प्रश्न रत्ना पाठक यांना विचारण्यात आला होता. त्यावर जर, त्यांना लाज वाटत नाही तर मी काय बोलू? त्यांना त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना लाज वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. म्हणजे थोडक्यात हे फार लाजीरवाणं आहे, असं रत्ना पाठक म्हणाल्या.
या मुलाखतीमध्ये त्यांनी समाजात आणि सिनेमात महिलांकडे ज्या दृष्टीने पाहिलं जात त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बदल नक्कीच होईल. स्त्रिया आता बुर्का किंवा डोक्यावर पदर घेऊन राहणार नाहीत. आता महिलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. महिला नक्कीच त्यांचा वेगळा मार्ग काढतील. याला वेळ लागेल पण नक्कीच त्या मार्ग काढतील, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, धक धक या सिनेमात रत्ना पाठक एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या सिनेमात त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी बाईक चालवली. त्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव फार वेगळा होता.