‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’ची बॉक्स आॅफिसवर धूम

By Admin | Published: May 25, 2015 11:12 PM2015-05-25T23:12:48+5:302015-05-25T23:12:48+5:30

एल. राय दिग्दर्शित ‘तनू वेड्स मनू’चा पुढचा भाग ‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’ने पहिल्याच दिवशी ८ कोटी रुपयांची चांगली सुरुवात केली.

Dhanu at the box office of Tanu Weds Manu Returns | ‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’ची बॉक्स आॅफिसवर धूम

‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’ची बॉक्स आॅफिसवर धूम

googlenewsNext

‘पिकू’नंतर आणखी एका महिलाप्रधान चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला आनंद एल. राय दिग्दर्शित ‘तनू वेड्स मनू’चा पुढचा भाग ‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’ने पहिल्याच दिवशी ८ कोटी रुपयांची चांगली सुरुवात केली. त्यानंतर या चित्रपटासाठी शनिवार आणि रविवार चांगल्या कमाईचे दिवस ठरले. शनिवारी त्याने १३ कोटींची व रविवारी १६ कोटींची कमाई केली. याप्रमाणे पहिल्या तीन दिवसांत ३८ कोटींपेक्षा जास्त कमाई करून त्याने बॉक्स आॅफिसवर हलचल निर्माण केली. ‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’चे वैशिष्ट्य हे आहे की सोमवारीदेखील त्याला चांगली कमाई होत आहे. पहिला आठवडा पूर्ण होईपर्यंत चित्रपट ५० कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी आशा आहे. या कमाईचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आयपीएल नॉकआऊट पायरीवर आले असतानाही या चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही. विशेषत: रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना असूनही चित्रपटाने १६ कोटींचा व्यवसाय केला. हा एवढा व्यवसाय कोणत्याही मोठ्या चित्रपटाला मिळणाऱ्या यशापेक्षा कमी नाही.
तिकडे पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर मार खाल्लेल्या अनुराग कश्यपच्या ‘बाँबे वेल्वेट’ला सावरायची कोणतीही संधी मिळाली नाही. पहिल्या वीकेंडला १५ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. एकूण १०० कोटी रुपयांची गुंतवणूक झालेल्या ‘बाँबे वेल्वेट’ची दुसऱ्या वीकेंडला म्हणजे दहा दिवसांत कमाई २० कोटींच्या जवळपास झाली. ‘बाँबे वेल्वेट’साठी जे लोक कश्यपचे कौतुक करीत होते त्यांना बॉक्स आॅफिसवरील या आकड्यांनी या चित्रपटाची काय अवस्था केली हे दिसत असेलच. प्रेक्षकांना नुसत्याच गप्पा नकोत तर चांगला चित्रपट हवा असतो हे ‘बाँबे वेल्वेट’च्या अपयशाने कश्यप आणि त्याच्या भाटांना दाखविले आहे.
भावना आणि गती यांना जोडणाऱ्या शुजित सरकारचे दिग्दर्शन असलेल्या ‘पिकू’च्या यशाचा घोडा तिसऱ्या आठवड्यातही पळत आहे. पहिल्या वीकेंडला २५ कोटींची कमाई करणाऱ्या पिकूची आतापर्यंतची कमाई ७१ कोटींच्या पुढे गेली आहे. पिकूवरील गुंतवणूक फक्त ३० कोटी रुपयांची होती त्यामुळे त्यावर गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा चित्रपट कमाई देणारा ठरला. आजही प्रेक्षक तो बघण्यास चित्रपटगृहात जात आहेत. अक्षय कुमारच्या ‘गब्बर इज बॅक’ची कमाई ८५ कोटींपर्यंत गेली आहे.

येत्या शुक्रवारी वाशू भगनानीचा ‘वेलकम टू कराची’ प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रमुख भूमिका जॅकी भगनानी आणि अर्शद वारसी यांची आहे. या चित्रपटाचा प्रचार फारच कमकुवत असून, त्याच्याकडून कुठल्याच अपेक्षाही नाहीत.
च्तनू वेड्स मनू रिटर्नस् - हिट
च्बाँबे वेल्वेट - सुपर फ्लॉप
च्पिकू - हिट
च्गब्बर इज बॅक - सरासरी
च्मार्गेरिटा विथ स्ट्रॉ - फ्लॉप

Web Title: Dhanu at the box office of Tanu Weds Manu Returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.