Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: धनुष-ऐश्वर्या रजनीकांतची अशी झाली होती पहिली भेट; वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:56 AM2022-01-18T11:56:35+5:302022-01-18T11:57:05+5:30

Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth) यांनी आता एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: This was the first meeting between Dhanush and Aishwarya Rajinikanth; Read their abandoned love story | Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: धनुष-ऐश्वर्या रजनीकांतची अशी झाली होती पहिली भेट; वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी

Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: धनुष-ऐश्वर्या रजनीकांतची अशी झाली होती पहिली भेट; वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी

googlenewsNext

अभिनेता धनुष (Dhanush)ने पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) सोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. धनुषने नुकतीच घटस्फोटाची घोषणा केली आहे, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. लग्नाच्या १८ वर्षानंतर धनुष आणि ऐश्वर्या विभक्त झाले आहेत. धनुषने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. 

२००४ साली धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतने सात फेरे घेतले पण आता त्यांनी वेगळे होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. मात्र एक वेळ होता जेव्हा त्यांच्या रिलेशनशीपची खूप चर्चा झाली होती. खरेतर, धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट थिएटरमध्ये झाली होती. धनुष आणि ऐश्वर्या 'कदल कोंडे'मध्ये समोरासमोर आले होते. धनुष आपल्या कुटुंबासह शो पाहण्यासाठी गेला होता आणि रजनीकांत यांच्या दोन्ही मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या तिथे उपस्थित होत्या. शो संपल्यानंतर, धनुषची ऐश्वर्या आणि सौंदर्यासोबत थिएटर मालकाने ओळख करून दिली आणि यादरम्यान धनुषने फक्त 'हॅलो' म्हटले. ऐश्वर्याला पहिल्याच भेटीत धनुष आवडला. 

या कारणामुळे धनुष ऐश्वर्यावर झाला होता इंप्रेस
त्यानंतर ऐश्वर्याने धनुषच्या घरी एक गुलाबाचा बुके पाठवला. त्यावर लिहिलं होतं की, 'गुड वर्क, स्टे इन टच'. धनुषला ऐश्वर्याचा हा अंदाज खूपच भावला होता. यानंतर हळूहळू त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. ते बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले आणि त्यांच्या नात्याच्या बातम्या मीडियात येऊ लागल्या. सोशल मीडियावर त्यांचे अफेयर असल्याची चर्चा सुरू झाली. अफेअरच्या अफवेमुळे धनुष आणि ऐश्वर्या दोघेही हैराण झाले होते आणि हे सर्व रजनीकांत यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. चर्चा टाळण्यासाठी दोघांच्या कुटुंबीयांनी ऐश्वर्या आणि धनुषचे लग्न लावून दिले. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी १८ नोव्हेंबर, २००४ साली लग्न केले. आता धनुष आणि ऐश्वर्याने लग्नाच्या १८ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुले आहेत.

Web Title: Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: This was the first meeting between Dhanush and Aishwarya Rajinikanth; Read their abandoned love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.