मुलीच्या संसारासाठी रजनीकांत सरसावले; ऐश्वर्या-धनुषचे लग्न वाचवण्यासाठी करताहेत प्रयत्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 08:55 PM2022-10-14T20:55:15+5:302022-10-14T20:58:06+5:30
धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
Dhanush And Aishwaryaa Divorce: साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwaryaa) गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी सोशल मीडियावरद्वारे विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती. पण, आता धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे.
मुलीच्या संसारासाठी रजनीकांत सरसावले
नुकतीच बातमी आली होती की, धनुष आणि ऐश्वर्या त्यांचा घटस्फोटाचा निर्णय मागे घेण्याचा विचार करत आहेत. दोघांच्या कुटुंबीयांनी धनुष आणि ऐश्वर्याला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. आता बातमी येत आहे की, धनुषचे सासरे म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत देखील मुलीचे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते धनुष आणि ऐश्वर्याला समजावून सांगत आहेत.
काय म्हणाले होते धनुष-ऐश्वर्या?
या वर्षाच्या सुरुवातीला धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर विभक्त होणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, त्यांनी लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंतीही केली होती. धनुषने लिहिले होते की, 'मित्र म्हणून, एक जोडपे म्हणून, पालक म्हणून आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून, 18 वर्षांचा प्रवास जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण, आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगळे होत आहेत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा...