दोन लग्नानंतरही तिस-यांदा प्रेमात पडले होते धर्मेंद्र, हेमामालिनीला समजताच घडले होते असे काही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:40 AM2021-06-04T11:40:52+5:302021-06-04T11:50:10+5:30
मामालिनी यांच्यासह अफेअर सुरु झाले तेव्हा धर्मेंद्र आधीच विवाहीत होते.
बॉलिवूडमध्ये कलाकारांचे अफेअर नेहमीच चर्चेत असतात. अशा अनेक कलाकारांचे अफेअर गाजले आहेत जे सतत चर्चेत असतात. बॉलीवूडचे हिमॅन धर्मेंद्र ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी दोघे त्यांच्या अफेअरमुळे प्रचंड चर्चेत होते.शोले सिनेमातली वीरु बसंतीची रिल लाइफ लवस्टोरी रियल लाइफमध्येही रंगू लागली होती.खरंतर शराफत या सिनेमापासून धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची जोडी चांगलीच चर्चेत आली.
यांतला दोघांच्या अभिनयानं रसिकांवर जादू केली..हेमामालिनी यांनी आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवलंच.. मात्र आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं बॉलीवुडच्या हिमॅनच्या काळजातही हेमामालिनी यांनी अढळ स्थान मिळवलं.विशेष म्हणजे हेमामालिनी यांच्यासह अफेअर सुरु झाले तेव्हा धर्मेंद्र आधीच विवाहीत होते.
धर्मेंद यांचे फक्त हेमामालिनीच नाही तर इतर अभिनेत्रींसह अफेअरच्या चर्चा रंगायच्या .अभिनेत्री अनिता राज यांच्यासह धर्मेंद यांचे अफेअर सुरु असल्याचे प्रचंड चर्चा रंगली. अभिनेत्री अनिता राज ८०च्या दशकात खूपच लोकप्रिय होती. सिनेमात एकत्र काम करताना दोघांची जवळीक वाढली होती. सगळ्यात आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे.
धर्मेंद्र आणि अनिता राज दोघांचे प्रेमप्रकरण सुरु झाले तेव्हा हेमामालिनीसह त्यांनी दुसरे लग्न केले होते. दुस-यांदा संसार थाटल्यानंतरही धर्मेंद्र तिस-यांदा प्रेमात पडले होते. मात्र या अफेअरची चर्चा हेमामालिनी यांना समजली तेव्हा धर्मेंद्र यांना धमकीच दिल्याचे बोलले जाते. हेमामालिनी यांच्या भीतीमुळेच धर्मेंद्र अनिता राज एकमेकांपासून दुरावल्याचे बोलले जाते.
अफेअरच्या चर्चा असल्यामुळे अनिता राज वादातही सापडल्या होत्या. अखेर त्यांनीही निर्माता सुनील हिंगोरानी यांच्याशी लग्न करत संसार थाटला आणि कायमचे धर्मेंद्र यांच्यापासून दूर गेल्या. दुसरीकडे धर्मेंद्रही त्यांच्या वैवाहिक जीवनात बिझी झाले. धर्मेंद्र यांचे हेमामालिनीवर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे ईशा आणि अहाना या दोघींच्या जन्माच्या वेळी चाहत्यांचा त्रास होऊ नये म्हणून धर्मेद्र यांनी पूर्ण हॉस्पिटलच हेमामालिनी यांच्या नावे बुक केले होते.”