'देओल कुटुंबाला इंडस्ट्रीने त्यांचा हक्क...' धर्मेंद्र यांनी बॉलिवूडबाबत व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 03:26 PM2023-08-20T15:26:12+5:302023-08-20T15:27:08+5:30

इंडस्ट्रीने आमचं कौतुक करण्याची गरज नाही.

dharmendra says deol family didnt got their right from industry says he dosent do marketing | 'देओल कुटुंबाला इंडस्ट्रीने त्यांचा हक्क...' धर्मेंद्र यांनी बॉलिवूडबाबत व्यक्त केली नाराजी

'देओल कुटुंबाला इंडस्ट्रीने त्यांचा हक्क...' धर्मेंद्र यांनी बॉलिवूडबाबत व्यक्त केली नाराजी

googlenewsNext

बॉलिवूडचे हँडसम अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं कुटुंब सध्या खूपच चर्चेत आहे. मुलगा सनी देओलचा (Sunny deol)  'गदर 2' तुफान हिट झालाय. शिवाय सनी देओलच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं. धर्मेंद्र यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातील शबाना आजमी यांच्यासोबतचा किसींग सीन गाजला. इतकंच नाही तर सनी देओल आणि ईशा देओल या सावत्र भावंडांमध्ये अनेक वर्षांचा अबोला मिटला. त्यामुळे सध्या देओल कुटुंब बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. मात्र देओल कुटुंबाला बॉलिवूडमध्ये त्यांचा हक्क मिळाला नाही असं वक्तव्य धर्मेंद्र यांनी नुकतंच केलंय.

धर्मेंद्र एका मुलाखतीत म्हणाले, 'आमचं कुटुंब मार्केटिंग करत नाही. आम्हाला असं वाटतं की आमचं काम बोललं पाहिजे. सनीचा चित्रपट ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरली. पण त्याच्या तोंडून तुम्ही कधीच स्वत:बद्दल कौतुक ऐकलं नसेल. छोटा मुलगा बॉबीही चांगलं काम करत आहे. पण आमच्या कुटुंबाला आमचा हक्क मिळाला नाही. पण आम्हाला फरक पडत नाही कारण चाहत्यांचं प्रेम आमच्यासाठी खूप आहे. इंडस्ट्रीने आमचं कौतुक करण्याची गरज नाही. १९६९ साली आलेल्या माझ्या सत्यकाम फिल्मसाठी मला एकही अवॉर्ड मिळाला नव्हता.'

ते पुढे म्हणाले,'देवाने या वर्षी आम्हाला आशिर्वाद दिला आहे.मी नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असणार ज्यामुळे मला आज इतका आनंद मिळतोय. माझ्या नातवाचं लग्न झालं, सनीचा सिनेमा हिट झाला आणखी काय हवं.'

सनी देओलच्या 'गदर 2' ने छप्परफाड कमाई केली आहे. नऊच दिवसात सिनेमाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. 

Web Title: dharmendra says deol family didnt got their right from industry says he dosent do marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.