‘ठाकरे’ चित्रपटामधून ‘तो’ डायलॉग हटविला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:56 AM2019-01-22T04:56:01+5:302019-01-22T04:56:12+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘हटाव लुंगी’ या शब्दावर आधारित डायलॉगवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता.

The dialog was deleted from 'Thakre' movie | ‘ठाकरे’ चित्रपटामधून ‘तो’ डायलॉग हटविला

‘ठाकरे’ चित्रपटामधून ‘तो’ डायलॉग हटविला

googlenewsNext

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘हटाव लुंगी’ या शब्दावर आधारित डायलॉगवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दामुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे निर्मात्यांनी या शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरले आहेत. चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकू नये, यासाठी निर्मात्यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन हाती घेतले होते. त्या वेळी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ अशी घोषणा शिवसेनेने केली होती. याच आंदोलनाचे चित्रण ठाकरे चित्रपटात आहे. मात्र, ‘हटाव लुंगी’ या घोषणेवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. यामुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे मत मांडले. त्यामुळे चित्रपटातून ‘हटाव लुंगी’ शब्द काढून, त्याऐवजी ‘उठाव लुंगी’ असे शब्द वापरण्याची तयारी निर्मात्यांनी दर्शविली. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Web Title: The dialog was deleted from 'Thakre' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.