ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:56 PM2019-01-02T13:56:46+5:302019-01-02T13:57:34+5:30
मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
ठळक मुद्देअभिनेते ऋषी कपूर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. याचमुळे आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही ऋषी कपूर हजर होऊ शकले नव्हते. खुद्द ऋषी कपूर यांनी उपचारासाठी अमेरिकेला जात असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गत काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. ऋषी कपूर यांना काय झालेय, हे कळायला मार्ग नाही. मात्र मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. याला कारण आहे, ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंग कपूर यांची एक ताजी पोस्ट.
होय, कपूर कुटुंबाने अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये नववर्षाचे स्वागत केले. रणबीर कपूर, आलिया भट्ट, ऋषी कपूर, नीतू सिंग, रिद्धिमा कपूर असे सगळे या सेलिब्रेशनमध्ये सामील झालेत. या सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेले कॅप्शन बरेच ‘सूचक’ आहे. ‘नवीन वर्षांचा काहीच संकल्प नाही. केवळ प्रदूषण कमी होऊ देत. आशा आहे की, भविष्यात ‘कॅन्सर’ हे फक्त एका राशीचेचं नाव असेल. गरिबी कमी होऊ आणि भरपूर प्रेम व सुदृढ आरोग्य लाभू दे...’, असे नीतू सिंग यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले. नीतू सिंग यांची ही पोस्ट वाचून ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही ना? असा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांना पडला आहे. अर्थात कपूर कुटुंबीय यासंदर्भात मौन बाळगून आहे.
अभिनेते ऋषी कपूर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. याचमुळे आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही ऋषी कपूर हजर होऊ शकले नव्हते. खुद्द ऋषी कपूर यांनी उपचारासाठी अमेरिकेला जात असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.मी उपचारासाठी अमेरिकेत जातोय. मी लवकर परत येईल. कृपया कुठलेही तर्क काढू नये, असे ट्विट त्यांनी केले होते. अर्थात आपल्या आजाराबद्दल त्यांनी कुठलाही खुलासा केला नव्हता.