फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 04:37 PM2023-01-19T16:37:29+5:302023-01-19T16:40:35+5:30

Guess Who: फोटोत दिसणारी ही मुलं आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही

Did you recognise ranbir kapoor sonam kapoor and arjun kapoor and these 2 stars | फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

googlenewsNext

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता.

इंटरनेटवर एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एकत्र आहेत. फोटोत दिसणारी ही मुले आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही. या व्हायरल फोटोमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील 5 स्टार्स आहेत, पण त्यांना ओळखणे फार कमी लोकांना जमले आहे. हा ग्रुप फोटो कपूर कुटुंबाचा आहे. तुम्ही यापैकी काही ओळखू शकाल का?


व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सोनम कपूर(Sonam Kapoor), रणबीर कपूर(Ranbir Kapoor), अंशुला कपूर (Anshula Kapoor), अर्जुन कपूर(Arjun Kapoor), अनिल कपूर(Anil Kapoor)चा मुलगा हर्षवर्धन कपूर (Harshwardhan Kapoor) फोटोत शेवटी बसलेला मुलगा ज्याने विक्ट्री साईन केलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून रणबीर कपूर आहे. अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा भाऊ हर्षवर्धन कपूरसोबत दिसत आहे. सोनमच्या शेजारी अर्जुन कपूर लाल टी-शर्टमध्ये चष्मा घातलेला आहे.  सोनमच्या मागे अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर एका मुलाला मांडीवर घेऊन बसली आहे. .

 

Web Title: Did you recognise ranbir kapoor sonam kapoor and arjun kapoor and these 2 stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.