चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला पाहिलंत का?, ती आहे या क्षेत्रात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:00 AM2022-03-29T07:00:00+5:302022-03-29T07:00:06+5:30

Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे. मात्र ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

Did you see Chinmay Mandlekar's wife? She is working in this field | चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला पाहिलंत का?, ती आहे या क्षेत्रात कार्यरत

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला पाहिलंत का?, ती आहे या क्षेत्रात कार्यरत

googlenewsNext

अभिनेता चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar)ने अनेक नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज या चारही माध्यमात तुफान काम केले आहे. त्याचप्रमाणे तो उत्तम नाट्यलेखक देखील आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीत त्याचा बोलबाला आहेच. मात्र, आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्याने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. नुकताच तो  द कश्मीर फाइल्स(The Kashmir Files)मध्ये पाहायला मिळाला. या चित्रपटात त्याने साकारलेला बिट्टा कराटे प्रेक्षकांना खूपच भावला. त्याच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा झाली. तसेच तो पावनखिंड (Pawankhind) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. चिन्मय मांडलेकरच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. त्याची पत्नी एक उत्तम फोटोग्राफर असून तिच्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही.

चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नीचे नाव नेहा जोशी मांडलेकर असून ती फारशी प्रसिद्धी झोतात येत नाही. त्याची पत्नी फोटोग्राफर असून ती वाइल्ड फोटोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे आणि चिन्मय सोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नेहाने मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री नेहा जोशी हिचे फोटोशूट केले होते आणि या फोटोशूटची सर्वत्र खूप चर्चा झाली होती. 


चिन्मय मांडलेकरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर तो शेर शिवराज या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

त्या काळी विजापूरच्या दरबारात 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे.‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'शेर शिवराज' चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या २२ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Did you see Chinmay Mandlekar's wife? She is working in this field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.