'रुस्तम' चित्रपटातील या चुका तुम्हाला समजल्या का ?

By Admin | Published: August 17, 2016 09:28 PM2016-08-17T21:28:51+5:302016-08-17T21:28:51+5:30

टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. तिकीटबारीवर रुस्तम हाऊसफुल सुरु असला तरी नेटीझममध्ये खिल्ली उडवली जात आहे.

Did you understand these mistakes in the movie 'Rustam'? | 'रुस्तम' चित्रपटातील या चुका तुम्हाला समजल्या का ?

'रुस्तम' चित्रपटातील या चुका तुम्हाला समजल्या का ?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. तिकीटबारीवर रुस्तम हाऊसफुल सुरु असला तरी नेटीझममध्ये खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांना १९५९ मधील बहुचर्चित नानावटी केसचा थरारक काळ अनुभवण्याची संधी मिळत आहे. असे असतानाच सोशल मीडियावर मात्र या चित्रपटाबाबतची एक वेगळीच चर्चा रंगत आहे. अक्षय कुमारने परिधान केलेल्या नौदलाच्या गणवेशामध्ये अनेक चुका निदर्शनात आणण्याचे काम सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
रुस्तम पावरीची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारच्या वर्दीत खुप साऱ्या चुका आहेत. इंडिया टुडेचे माजी संपादक संदीप उन्नीथन यांनी ट्विटवर याची माहिती दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर चला जाणून घेऊयात काय आहेत रुस्तममधील चुका - 
 
नौदलाच्या अधिकाऱ्यांना दाढीशिवाय मिशी ठेवण्याची परवानगी १९७१ नंतर मिळाली आहे. तर अक्षय सिनेमात केवळ मिशी असलेल्या लूकमध्येच दिसतो. वर्दीवर जे बॅज लावले आहेत, ते कारगील १९९९ मधील आहे. १९७० नंतर नेम टॅग अर्थात नावाची पट्टी वर्दीवर लावण्यास सुरुवात झाली.
 
सिल्व्हर जुबली मेडल १९७२ नंतर देण्यास सुरुवात झाली. मात्र सिनेमाची कथा १९५९ मधील असूनही अक्षयच्या वर्दीवर हे मेडल दिसतात. अक्षयच्या वर्दीत बार कर्ल रिव्हर्स दाखवण्यात आलं आहे, जे नियमांच्या विरोधात आहे. ओपी पराक्रम मेडल हे तर २००१-०२ मध्ये देण्यास सुरु झाले आहे.
 
यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे. यापूर्वी हाऊसफुल ३ आणि एअरलिफ्ट या दोन चित्रपटांनी ही कामगिरी केली होती. या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटींहून अधिक व्यवसाय केला होता.

Web Title: Did you understand these mistakes in the movie 'Rustam'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.