नाटक करण्यात वेगळीच नशा

By Admin | Published: October 21, 2016 03:54 AM2016-10-21T03:54:18+5:302016-10-21T03:54:18+5:30

अभिनेता समीर धर्माधिकारीने हिंदी-मराठी चित्रपट, नाटके, मालिकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. लवकरच समीर

Different drug addiction | नाटक करण्यात वेगळीच नशा

नाटक करण्यात वेगळीच नशा

googlenewsNext

अभिनेता समीर धर्माधिकारीने हिंदी-मराठी चित्रपट, नाटके, मालिकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. लवकरच समीर आपल्याला कौल मनाचा या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या या भूमिकेविषयी लोकमत सीएनएक्सने समीरशी साधलेला खास संवाद...

कौल मनाचा या चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे ?
ल्ल खरे सांगू का? या चित्रपटातील माझी भूमिका फार लहान आहे. तसे म्हणायला गेलात, तर यामध्ये माझी पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे, असे म्हणायलाही काहीच हरकत नाही. पण, भूमिका जरी लहान असली, तरी ती खूपच छान आहे. मी यामध्ये अमृता पत्कीच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका केलीय. ही भूमिका करताना फारच मजा आली.

तू ही भूमिका निवडण्यामागचे कारण काय होते ?
ल्ल या चित्रपटाच्या निर्मात्यांना मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून खतो. जेव्हा माझ्याकडे लक्ष्मणदादा आले तेव्हा त्यांनी मला या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगितले. या वेळी एक गोष्ट त्यांनी मला आवर्जून सांगितली, की या भूमिकेत तू फक्त चेहरा दाखवून जायचे नाही, तर त्या भूमिकेला फार महत्त्व आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझी भूमिका खरेच खूप महत्त्वाची आहे. हा चित्रपट वेगळ्या संकल्पनेवर आहे आणि यामध्ये मला छोटासा रोल करायला मिळाला, ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे.

तुला बॉलिवूडमध्ये की मराठी चित्रपटांमध्ये काम करताना जास्त कम्फर्टेबल वाटते?
ल्ल माझ्या दृष्टीने हिंदी-मराठी असा काही फरक नाही आहे. मी एका तेलुगू चित्रपटामध्येही काम केले आहे; पण मराठी चित्रपटांमध्ये काम करताना खरेच छान वाटते. त्याचे कारण असे, की आम्ही मराठी चित्रपटांमध्ये काम करताना टीममधील बरेच कलाकार एकत्र जेवतो, मस्त गप्पा मारतो. बऱ्याच दिवसांपासून आम्ही एकमेकांना ओळखत असल्याने इथे काम करताना वेगळीच मजा येते. तर, हिंदीमध्ये प्रत्येकाला प्रायव्हसी असते. ती काम करण्याच्या दृष्टीने चांगलीदेखील असते. तिथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला येत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. मी मात्र मराठीत जास्त कम्फर्टेबल फील करतो.

 मराठी चित्रपटसृष्टी बदलतेय, मराठी चित्रपट वेगळ्या उंचीवर जात आहेत त्याबद्दल तुझे काय मत आहे?
ल्ल आपण आधीपासूनच चित्रपटांच्या दृष्टीने श्रीमंतच होतो. आता मराठी चित्रपटसृष्टीत योग्य नियोजन होऊ लागल्याने चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग मिळतो आहे. चित्रपटांच्या दर्जेदार कथा असल्याने प्रेक्षक चित्रपट पाहायला येत आहेत आणि चित्रपट हाऊसफुल्लदेखील होत आहेत. आपला बाज बदलला आहे. आपल्याकडे साहित्याचा खजिना आहे. सध्याचे जे नवीन लेखक येत आहेत, त्यांचे काम उल्लेखनीय आहे. मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वेगळे लेखन, साहित्य आणि गोष्ट असते. आपण उत्तम साहित्यकार, नाटककार आणि फिल्ममेकर होतोच आणि कायम राहणार.

तू प्रेक्षकांना रंगमंचावर कधी दिसणार आहेस?
ल्ल मी माझ्या करिअरची सुरुवातच रंगमंचापासून केली आहे. नाटकाला पूर्णवेळ द्यावा लागतो. सध्या मी जे काम करतोय, जे प्रोजेक्ट्स निवडतोय त्यामधून नाटकासाठी वेळ देणे अवघड होतेय. गेल्या चार-पाच वर्षांपासून माझी नाटकात काम करण्याची खूप इच्छा आहे; मात्र काहीना काही अडचणींमुळे ती पूर्ण होत नाहीये. माझे शेवटचे नाटक नथुराम गोडसे होते; पण लवकरच मी नाटकात काम करीन. मला नेहमीच असे वाटते, की नाटकात काम करण्याची नशाच वेगळी असते.

- priyanka.londhe@lokmat.com

Web Title: Different drug addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.