'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 03:39 PM2024-02-20T15:39:27+5:302024-02-20T15:40:42+5:30

'शिवरायांचा छावा' बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड चित्रपटांवर भारी पडला आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

digpal lanjekar shivrayancha chhava movie on chhatrapati sambhaji maharaj box office collection | 'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा 'शिवरायांचा छावा' हा सिनेमा १६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकरांचं दिग्दर्शन असलेल्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'शिवरायांचा छावा' बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड चित्रपटांवर भारी पडला आहे. अवघ्या चारच दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

'फत्तेशिकस्त', 'फर्जंद', 'पावनखिंड', 'सुभेदार', 'शेर शिवराज' यातून छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची गाथा सांगितल्यानंतर दिग्पाल लांजेकर संभाजी महाराजांवरील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. 'शिवरायांचा छावा' सिनेमालाही प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळत आहे. या सिनेमाचे शोज थिएटरमध्ये हाऊसफुल होत आहेत. या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. या सिनेमाने चार दिवसांत तब्बल ५.१२ कोटींची कमाई केली आहे. 

'शिवरायांचा छावा' सिनेमात अभिनेता भूषण पाटील मुख्य भूमिकेत आहे. त्याने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर तृप्ती तोरडमल हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊंच्या आणि चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. याबरोबरच विक्रम गायकवाड, रवी काळे, अभिजीत श्वेतचंद्र या कलाकरांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: digpal lanjekar shivrayancha chhava movie on chhatrapati sambhaji maharaj box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.