'सडक2' सिनेमातील नवीन गाणे प्रदर्शित होताच मिळतायेत डिसलाइक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:31 PM2020-08-25T13:31:50+5:302020-08-25T13:32:29+5:30

'सडक 2' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांतच लाखो नेटीझन्सनी डिसलाइक्स देत नापसंती दर्शवत तिव्र नाराजी व्यक्त केली होती.

Dil ki purani sadak From sadak 2 Movie second song Release Dislikes More than likes | 'सडक2' सिनेमातील नवीन गाणे प्रदर्शित होताच मिळतायेत डिसलाइक्स

'सडक2' सिनेमातील नवीन गाणे प्रदर्शित होताच मिळतायेत डिसलाइक्स

googlenewsNext

आजपर्यंत सर्वाधिक डिसलाईक्स मिळवणारा सडक २ सिनेमाची प्रदर्शनाची तारिख जसजशी जवळ येत आहे. तसतसे रसिक सिनेमाला तीव्र नाराजी दर्शवत आहेत. बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाल्यापासून  स्टार किड्सनावर देखील आता रसिक निशाणा साधत आहेत. त्यामुळे  स्टार किड्सच्या फिल्म्सनाही आता रसिक नापसंती देत असल्यामुळे त्यांचे भविष्य कितपत उज्वल आहे हे वेळ आल्यावर स्पष्ट होईल.  अभिनेत्री आलिया भट्टच्या  आणि अभिनेता  संजय दत्त  यांचा सडक 2 सिनेमा याचेच उत्तम उदाहरण आहे.  ट्रेलर प्रदर्शित  होताच अवघ्या काही तासांतच लाखो नेटीझन्सनी डिसलाइक्स देत नापसंती दर्शवत तिव्र नाराजी व्यक्त केली होती. 

ट्रेलर पाठोपाठ सिनेमाती गाण्यांनानीह नेटीझन्स डिसलाइक्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ''दिल की पूरानी सडक'' हे गाणे प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांतच या गाण्यालाही डिसलाइक्सचा सामाना करावा लागला.  जवळपास 11 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे. त्यातील ११ हजार लोकांनी लाइक केले आहे तर ३१  हजार लोकांनी डिसलाइक केले आहे. त्यामुळे सिनेमाच्या ट्रेलर प्रमाणेच गाणे प्रदर्शित होताच डिसलाइक करणाऱ्यांची संख्या 
सर्वाधिक आहे.  


सडक-2 मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक आहेत. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपटाला रोषाचा सामना करावा लागत आहे. पहिल्या ‘सडक’ सिनेमातील संजय दत्त आणि पूजा भट्टच्या एका सीनने या गाण्याची सुरूवात होते. त्यामुळे जुना 'सडक' सिनेमा आठवल्याशिवाय राहत नाही. मुखर्जी आणि उर्वी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तर  केके पुन्हा एकदा लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. त्याचबरोबर 'दिल की पुराणी सडक' गाणे विजय विजवत यांनी लिहिले असून  सोनी म्युझिक बॅनरने हे गाणे प्रदर्शित केले आहे. महेश भट्ट दिग्दर्शित हा सिनेमा 28 ऑगस्टला  डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिनमाच्या माध्यमातून  महेश भट्ट पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. 'सडक 2' प्रदर्शित झाल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


१९९१ मध्ये 'सडक' हा सिनेमा पदर्शित झाला  होता. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. यातील म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या सिनेमाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या सिनेमात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत 'सडक२'मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जाणार आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे.

Web Title: Dil ki purani sadak From sadak 2 Movie second song Release Dislikes More than likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.