जेव्हा सायरा बानोला सोडून दिलीप कुमार यांनी केलं होतं दुसरं लग्न, नंतर झाला होता चांगलाच पश्चात्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 03:40 PM2021-12-11T15:40:24+5:302021-12-11T15:54:50+5:30

दिलीप कुमार (Dilip Kumar) हे 60 च्या दशकाचे सुपरस्टार होते. रसिक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहायचे.सायरा बानो (saira banu) या त्यांच्या मोठ्या चाहत्या होत्या.

Dilip kumar 99th birthday when he leaves saira banu for second marriage slide | जेव्हा सायरा बानोला सोडून दिलीप कुमार यांनी केलं होतं दुसरं लग्न, नंतर झाला होता चांगलाच पश्चात्ताप

जेव्हा सायरा बानोला सोडून दिलीप कुमार यांनी केलं होतं दुसरं लग्न, नंतर झाला होता चांगलाच पश्चात्ताप

googlenewsNext

Dilip Kumar Birth Anniversary: दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी जवळपास ५ दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका करुन अनेक प्रयोग केले. हिंदी सिनेसृष्टीत त्यांचे नाव कोणीही विसरू शकत नाही. करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही खूप चर्चा झाली आहे.दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचा विवाह अभिनेत्री सायरा बानो  (saira banu)  यांच्यासोबत झाला होता. सायरा यांनी शेवटच्या क्षणापर्यंत दिलीप कुमार यांची पूर्ण काळजी घेतली. पण एक क्षण असा आला जेव्हा दिलीप कुमार यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात केलेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप झाला. 

दिलीप कुमार  (Dilip Kumar) हे 60 च्या दशकाचे सुपरस्टार होते. रसिक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहायचे.सायरा बानो ही त्यांच्या मोठ्या चाहत्यांपैकी एक होती.. एक दिवस सायरा दिलीपकुमारचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात पोहोचल्या. चित्रपटादरम्यान दिलीपकुमार यांना पडद्यावर पाहताच भारावून गेल्या होत्या.सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं.

ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दोघांमध्ये असलेल्या वयातील अंतरामुळे लग्न करावे की नाही या कारणामुळे दिलीप कुमारही संभ्रमात होते. पण सायराने निश्चयच केला होता की लग्न करेन तर दिलीप कुमार यांच्याशीच त्यामुळे दिलीप कुमार यांनीही लग्नासाठी होकार दिला आणि 1966 मध्ये दोघांनी लग्न केलं. सायरा बानो आपल्या वैवाहीक आयुष्यात खूप खुश होत्या. 1972मध्ये ज्यावेळी सायरा गरोदर राहिल्या आणि त्यांचं मिसकॉरेज झालं. यानंतर दोघांना कधीच मुलं झालं नाही.

विवाहीत असूनही दिलीप कुमार 1981 मध्ये पाकिस्तानच्या आसमा रेहमानशी दुसरे लग्न केले. 1983 मध्ये असमा आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये घटस्फोट झाला. आसमा आपल्याला धोका देत असल्याचे लक्षात येताच तिला सोडून दिलीप कुमार पुन्हा सायराकडे परतले.सायरा यांचे दिलीप कुमार यांच्यावर प्रचंड प्रेम होते. या प्रेमापोटीच त्यांनी दिलीप कुमार यांना माफ करत स्विकारले. पुढे दिलीप कुमार यांनाही आपल्या या चुकीचा पश्चात्ताप झाला. 

.

Web Title: Dilip kumar 99th birthday when he leaves saira banu for second marriage slide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.