म्हणून सायरा बानो आई होऊ शकल्या नाहीत, दिलीप कुमार यांनीच सांगितलं होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 06:30 PM2021-07-07T18:30:27+5:302021-07-07T18:44:20+5:30
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न झाले तेव्हा सायरा बानो 22 आणि दिलीप साहेब 44 वर्षांचे होते.
सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. तर सायरा २२ वर्षांच्या होत्या. काळानुसार दोघांचे प्रेम अधिकाधिक घट्ट होत गेले. या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांचीही जोडीवरुन नजर हटत नसे. चाहत्यांची फेव्हरेट जोडी बनली होती.
सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरीही इंटरेस्टींग होती. इतकेच काय तर या दोघांच्या नात्यातही चढउतार आले. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांना कधीही मुल झालं नाही. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना मूलबाळ नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. पण फार कमी लोकांना त्यामागचे कारण माहिती आहे.
याबाबत दिलीप कुमार यांनी आपली ऑटोबायोग्राफी 'द सबस्टांस अॅन्ड द शॅडो' यामध्ये लिहीलं आहे. 197 2मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा सायरा गरोदर होत्या. त्यावेळी आठव्या महिन्यामध्ये सायरा यांना ब्लडप्रेशरचा त्रास होऊ लागला. त्यावेळी गर्भाची वाढ जवळपास पूर्ण झाली होती. त्यावेळी बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणं शक्य नव्हतं. अशा क्रिटीकल परिस्थितीमध्ये श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर सायरा कधीही आई होऊ शकल्या नाही.
या कारणामुळे दिलीप कुमार यांनी केले होते दुसरे लग्न
काही दिवसांनी मात्र या दोघांच्या प्रेमाला ग्रहण लागलं. 1980 मध्ये दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न केलं. तेव्हा अशा चर्चांनी जोर धरला होता की, सायरा आई होऊ शकत नाही म्हणून बाळासाठी दिलीप कुमार यांनी दुस-या लग्नाचा निर्णय घेतला अशा बातम्या समोर येत होत्या. लोकांच्या प्रश्नांना घाबरून दिलीप कुमार यांनी घराबाहेर निघणेही बंद केले होते.
दिलीप कुमार यांच्या दुस-या लग्नामुळे सायरा पुरत्या खचल्या होत्या. असं म्हटलं जातं की, दिलीप यांनी असमासोबत मुलासाठी दुसरं लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 1983मध्ये असा आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये घटस्फोट झाला.