दिल ले गई फिल्म पंजाबदी

By Admin | Published: June 18, 2016 10:45 AM2016-06-18T10:45:55+5:302016-06-18T11:46:10+5:30

झाला एकदाचा प्रदर्शित.. सेकंदा-सेकंदाला येणारी शिवी आणि अतिशय वाह्यात संवाद यामुळे हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडणार हे साहजिकच होते. पण या चित्रपटात खरी अश्लीलता ही या चित्रपटाचा विषयच आहे.

Dilshan ji movie panjabi | दिल ले गई फिल्म पंजाबदी

दिल ले गई फिल्म पंजाबदी

googlenewsNext

tyle="text-align: justify;">जान्हवी सामंत

हिंदी चित्रपट : उडता पंजाब

 झाला एकदाचा प्रदर्शित.. सेकंदा-सेकंदाला असणार्‍या शिव्या आणि अतिशय वाह्यात संवाद यामुळे हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडणार हे साहजिकच होते. पण या चित्रपटात खरी अलिता ही या चित्रपटाचा विषयच आहे. तसे तर पहलाज निहलानींचे म्हणणे बरोबरच होते. उडता पंजाब या चित्रपटातील पंजाब हा आपल्याला माहीत असलेल्या बॉलीवूड आणि यश चोप्राच्या चित्रपटात दिसणार्‍या पंजाबपेक्षा खूप वेगळा आणि भयानक आहे. या चित्रपटामुळे पंजाबमधल्या ड्रग्जची समस्या किती गंभीर आणि खोलवर पोहोचलेली आहे, या सगळ्यात राजकारणी आणि पोलीस यांचे किती संगनमत आहे, हे आपल्याला कळते. त्यामुळे प्रेक्षकांना या भयानक सत्यापासून वाचवणे हे निहलानी आपले कर्तव्य मानत असतील कदाचित. असो..
उडता पंजाब हा तित्रपट तीन पैलूंमध्ये उलगडतो. हनी सिंग स्टाईल पॉप स्टार टॉमी सिंग (शाहिद कपूर), ड्रग्जविरोधात काम करणारी कार्यकर्ती डॉ. प्रीत सहानी (करिना कपूर) आणि निनावी बिहारी मजूर मुलगी (अलिया भट्ट). टॉमी सिंग हा कोकेन सेवनाच्या आहारी गेलेला पॉप स्टार असतो. पोलिसांच्या एका झडतीमध्ये तो पकडला जातो. अलिया ही एक राज्य स्तरावर हॉकी खेळणारी मुलगी असते. पण ती परिस्थितीमुळे ड्रग्जच्या कचाट्यात सापडते. डॉ. प्रीत ही तरुण मुलांना ड्रग्जची सवय सोडण्यासाठी मदत करीत असते. तिच्या आयुष्यात सरताज हा पोलीस ऑफिसर येतो, त्याच्या भावाला ड्रग्सचे व्यसन असते. तो भावाला या विखळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रीतची मदत घेतो. 
प्रीत आणि ते दोघे मिळून ड्रग्जच्या या जाळ्याचा शोध घेण्याचा विचार करतात आणि त्यावर अभ्यास सुरू करतात आणि यातून खूप धागे उलगडायला सुरुवात होते. समाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये ड्रग्ज किती पसरलेले आहे, हे यामुळे कळते. अभिषेक चौबे हे आपल्या शैलीचे पक्के आहेत. कोणत्याही विषयाची पार्श्‍वभूमी, वातावरण आणि सामाजिक घटक हे ते खूप चांगल्या रीतीने टिपतात. तसेच पंजाबचा रांगडेपणा, तिकडची बोली, स्वभाव, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या युवकांची तळमळही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केली आहे. 
उडता पंजाब खूप ठिकाणी देव डीची आठवण करून देतो. कदाचित अमित त्रिवेदीच्या संगीतामुळे असेल. चित्रपटाचे संगीत चित्रपटास अगदी साजेसे आहे. जिकडे पॉप तिकडे हलकेफुलके आणि मजेदार, जिकडे गंभीर तिथे खोल आणि हृदयस्पश्री. 
शाहिदने विक्षिप्त म्युजिशियनची भूमिका खूपच चांगल्यारीतीने पार पाडली आहे. त्याने लहरी माणसाच्या केलेल्या अभिनयात हॉलीवूड स्टार जॉनी डेप यांचा प्रभाव जाणवतो. करिनादेखील खूप दिवसांनंतर चांगल्या चित्रपटात झळकली आहे. पण उडता पंजाबमध्ये खरी परीक्षा होती ती अलियाची, बिननावाच्या अगदी क्षुल्लक मजदूरी करणार्‍या, जिच्यावर अतोनात अन्याय आणि अत्याचार होतात अशा दयनीय मुलीची भूमिका साकारण्याची धमक खूप कमी अभिनेत्रींमध्ये आहे. पण अलियाने तिचा मूकपणा आणि आक्रोश खूप छान व्यक्त केला आहे. उडता पंजाब जरूर पाहावा. अगदी चित्रपटगृहात जाऊनच. कारण ही गोष्ट फक्त पंजाबची नाही तर आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार आणि गरिबीमुळे होणार्‍या सगळ्या अत्याचारांची ही गोष्ट आहे.

दर्जा - ****

Web Title: Dilshan ji movie panjabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.