किस्सा : डिंपल कपाडिया अक्षय कुमारला समजायची गे , ट्विंकलशी लग्ना करण्यासाठी ठेवली होती ही विचित्र अट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:33 PM2021-12-22T17:33:40+5:302021-12-22T17:36:49+5:30
ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)ची आई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay kumar)चा लवकरच अतरंगी रे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासोबत सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारच्या बाबतीतील मजेशीर गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे त्याची सासू म्हणजे ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)ची आई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा आणि त्यांनी त्यांच्या मुलीला सल्लादेखील दिला होता.
ट्विंकल खन्नाला एका पत्रकार मित्रानं सांगितलं होतं की अक्षय गे आहे. डिंपल कपाडियाने मुलीला सल्ला दिला की तू व अक्षय एक वर्ष एकत्र रहा आणि मग पुढे काय करायचं ते ठरवा.
एका शोमध्ये काही वर्षांपूर्वी ट्विंकल खन्नाने सांगितलं होतं की, तिच्या आईला अक्षय कुमार गे असल्याचं वाटत होतं. त्यामुळे आमचं लग्न होऊ नये असं त्यांना वाटत होतं. ट्विंकलला प्रपोज केल्यानंतर जेव्हा तिने आईला अक्षयने लग्नासाठी मागणी घातल्याचं सांगितलं तेव्हा त्या चकीत झाल्या.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अक्षय कुमारचा 'ओएमजी २' (OMG 2)मधील लूक व्हायरल झाला होता. अक्षय कुमारच्या इंस्टाग्रामवरील फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत अक्षय कुमार फुल स्टाइलमध्ये वॉक करताना दिसत आहे. त्याने ब्लू रंगाची डेनिम केप्री घातली आहे आणि त्यासोबतच क्रिम रंगाचा लाँग स्वेटर घातला आहे. मात्र त्याच्या हेअर स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडीओत त्याचे लांब केस पाहायला मिळत आहे आणि पोनी टेल बांधला आहे. त्याचा हा लूक कुल वाटतो होता.